यावल – प्रतिनिधी
तालुक्यातील डांभुर्णी येथे काल सांयकाळी एका तीन महीन्याच्या बालिकेचा मृत्यू झाला. तीच्या मृत्यूबाबत शंका व्यक्त केली जात असून मरण पावलेल्या मुलीच्या कुटुंबास फैजपुर येथे विलगीकरणा कक्षात पाठविण्यात आले आहे.
या संदर्भात मिळालेल्या माहीती अशी की यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे काल दि.१७ मे रोजी एका तिन महीन्याच्या बालीकेचा मृत्यु झाला असुन, मरण पावलेला बालीकेचे मामा हे काही दिवसापुर्वी पुणे येथून आपल्या घरी आले असता त्यांना होम क्वारेंटाईन करण्यात आले होते.
सदर तीन महीन्याचे लहान बाळ मामाच्या संर्पकात आले असावे यातूनच हा त्या बालीकेस कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
मरण पावलेल्या बालीकेचे स्वॅब नमुने पाठविण्यात आले असुन दरम्यान या संदर्भात त्या तिन महीन्याच्या बालीकेला मागील तिन दिवसापुर्वी तिला सर्दी, खोकला, ताप असे प्रथम तपासात दिसुन आल्याचे किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.मानिषा महाजन यांनी सांगीतले. दरम्यान त्या बालीकेचा अंत्यविधी करण्यात आला आहे.