Sunday, April 6, 2025
Homeक्राईमखासगी इसम रंगेहाथ लाच घेताना अटकेत

खासगी इसम रंगेहाथ लाच घेताना अटकेत

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर युनिटने सापळा कारवाई करत एका खासगी इसमाला लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. संशयित आरोपीने शेवगाव- पाथर्डी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कारकुनांसाठी लाचेची मागणी करत तक्रारदारकडून 3 हजार रुपये स्वीकारले होते. तक्रारदार (पुरुष, 41) हे मुरूम वाहतुकीचा व्यवसाय करतात. त्यांच्या मालकीच्या डंपरने 30 जुलै 2023 रोजी मुरूम वाहतूक करत असताना शेवगाव पोलिसांनी वाहन जप्त करून तहसिलदार शेवगाव यांच्याकडे पुढील कारवाईसाठी दिले होते. तहसिलदारांनी तक्रारदारावर 2 लाख 36 हजार 300 रुपयांचा दंड आकारत डंपर लिलावात काढला होता.

- Advertisement -

तक्रारदारांनी 25 मार्च 2025 रोजी ही रक्कम चलनाद्वारे भरल्यानंतर, वाहन सोडण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी, पाथर्डी यांच्याकडे पाठविण्यात आले. मात्र, आदेश प्रक्रियेत विलंब होत असल्याने तक्रारदाराचे प्रकरण प्रलंबित होते. दरम्यान, अभिषेक जगताप (वय 35, रा. शास्त्रीनगर, शेवगाव), हा खासगी इसम तक्रारदाराच्या संपर्कात आला. त्याने डंपर वाहन सोडण्याचे आदेश लवकर मिळवून देण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील मोडसे यांच्यासाठी 7 हजार रुपयांची लाच मागितली. यासंदर्भात तक्रारदाराने 3 एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर येथे तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर लाच मागणीची पडताळणी 4 एप्रिल रोजी करण्यात आली.

त्यावेळी अभिषेक जगताप याने पंचासमक्ष लाच मागणी केली आणि 3 हजार रुपये तात्काळ स्वीकारण्यास सहमती दर्शवली. यानंतर लाचलुचपत विभागाच्या पथकाने तहसिल कार्यालय, शेवगाव येथे सापळा रचून त्याला 3 हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजु आल्हाट, महिला पोलीस अंमलदार राधा खेमनर, पोलीस अंमलदार चंद्रकांत काळे, दशरथ लाड यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तात्काळ भरपाई द्या – आ. दाते

0
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner तालुक्यातील अनेक गावांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडला आहे. झालेल्या नुकसानीचे शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश...