Friday, May 16, 2025
Homeनगरलाचखोर तलाठी जेरबंद

लाचखोर तलाठी जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

खरेदी केलेल्या जमिनीचे फेरफार (Land Fer Far) काढून देण्याच्या बदल्यात तलाठ्याने (Talathi) चक्क फोन पे वरच पाच हजार रुपयांची लाच (Bribe) घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हॉटेलमध्ये देहविक्री; तिघांवर गुन्हा दाखल

रामेश्वर गोरे (तलाठी, सजा खांडके, ता. नगर) असे तलाठ्याचे नाव आहे. शुक्रवार (दि.24) रोजी सुरुभि हॉस्पिटल चौकात लाचेचा (Bribe) सापळा लावण्यात आला होता. तक्रारदार यांनी त्यांचे 48 गुंठे जमीन दुसर्‍याला विकली होती. जमीन विक्रीची नोंद शासकीय अभिलेखात करून देण्याची जबाबदारी विक्रेत्यांनी घेतलेली. त्यानुसार त्यांनी तलाठी गोरे यांच्याकडे अभिलेखात बदल करून फेरफार मिळण्याची मागणी केली असता तलाठ्याने (Talathi) पाच हजार रुपयांची मागणी केली.

जिल्हा बँकेच्या चेअरमनपदासाठी हालचालींना वेग

तक्रारदार यांनी याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. केल्यानंतर या विभागांनी नगरमधील सुरभी हॉस्पिटल (Surbhi Hospital) चौकात सापळा लावला असता, तलाठी हा चौकात आला व त्याने तक्रारदार यांच्याकडून फोन पे वर पाच हजार रुपये घेतले. पैसे आल्याची खात्री करून निघून जात असतांनाच लाच लुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतला.

राष्ट्रवादीच्या सर्व भावी मुख्यमंत्र्यांना माझ्या शुभेच्छा – देवेंद्र फडणवीस

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर, पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, पोलीस हवालदार संतोष शिंदे, रवींद्र निमसे, वैभव पांढरे, सचिन सुद्रीक, व चालक हारुण शेख यांच्या पथकाने केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राजनाथ

Rajanath Singh: ‘कागज का है लिबास चरागों का शहर है, संभल-संभल...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi ऑपरेशन सिंदूरनंतर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी भुज एअरबेसवर पोहोचले. त्यांनी जवानांची भेट घेत त्यांचे भरभरून कौतुक केले....