नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR
सातबारा उतार्यावर सही शिक्का देण्याच्या मोबदल्यात ३ हजाराची लाच स्विकारणार्या अमलपाडा ता.तळोदा येथील तलाठयाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे.
तील तक्रारदारांच्या जमिनीच्या गाव नमुना ७/१२ महसूल अभिलेख्यावर नाव नोंद करून दिले आहे. तक्रारदारांचे नाव सातबारा उतार्यावर लाऊन देण्यासाठी व नाव लावून दिलेल्या कामाबाबत व नवीन नावाच्या सातबारा उतार्यावर सही शिक्का देण्याच्या मोबदल्यात लोकसेवक असलेल्या अंमलपाडा ता.तळोदा येथील तलाठी नंदलाल प्रभाकर ठाकूर याने दि.२६ जून २०२३ रोजी तक्रारदाराकडून ५, हजार रुपये लाचेची मागणी केली.
तडजोडीअंती ३ हजार रुपयांची लाचेची मागणी केली. मागणी केलेली लाचेची रक्कम ३ हजार रूपये आज दि.३ जुलै २०२३ रोजी पंच साक्षीदारांसमक्ष स्वीकारली. याबाबत तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षकश्रीमती माधवी वाघ, पर्यवेक्षण अधिकारीपोलीस उपअधीक्षक राकेश आ. चौधरी, सह सापळा अधिकारीपोलिस निरीक्षक समाधान वाघ यांनी काम पाहिले. सापळा कार्यवाही व मदत पथकातील पोहवा विजय ठाकरे, पोहवा विलास पाटील,
पोहवा ज्योती पाटील, पोना देवराम गावित, पोना मनोज अहिरे, पोना अमोल मराठे, चापोना जितेंद्र महाले यांचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, वाचक नरेंद्र पवार यांचे पथकाला मार्गदर्शन लाभले.