Friday, May 16, 2025
Homeधुळेहोळनांथेतील लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात

होळनांथेतील लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात

धुळे । Dhule । प्रतिनिधी

- Advertisement -

शेतीच्या सातबारा उतार्‍यावर(Seven twelve of agriculture) नाव बदलून मिळावे, यासाठी आठशे रूपयांची लाच (bribe of eight hundred rupees) घेणार्‍या पिंपळे (होळनांथे) ()Holanthe ता. शिरपूर येथील तलाठ्याला (Talathi) एसीबीच्या पथकाने (ACB team) रंगेहात (caught them red-handed) पकडले. आज दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे.

ज्ञानेश्वर जगन्नाथ बोरसे (वय 45) असे या तलाठ्याचे नाव आहे. शेतीच्या सातबारा उतार्‍यावर नाव बदलून मिळावे, या साठी तक्रारदार शेतकर्‍याने गावातील तलाठी कार्यालयातील तलाठी ज्ञानेश्वर बोरसे यांच्याकडे अर्ज करुन त्यांची भेट घेतली. तेव्हा तलाठी बोरसे यांनी सातबारा उतार्‍यावर नाव बदलून देण्यासाठी तक्रारदाराकडे 800 रुपयाची लाचेची मागणी केली.

त्यामुळे शेतकर्‍याने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकड तक्रार दिली. त्याची दखल घेत आज एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता तलाठी बोरसे यांनी सातबारा उतार्‍यावर नाव बदलून देण्यासाठी 800 रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच लाचेची रक्कमही शेतकर्‍याला तत्काळ आणून देण्याबाबत सांगितले. रक्कम स्वीकारल्यानंतर तलाठी बोरसे यांना पथकाने रंगेहात पकडले.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर व त्यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण व भुषण खलाणेकर, भुषण शेटे, प्रशांत बागुल, राजन कदम, कैलास जोहरे, शरद काटके,, संदिप कदम, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रविण पाटील, गायत्री पाटील, रोहिणी पवार, वनश्री बोरसे, सुधीर मोरे, जगदिश बडगुजर यांनी केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राजनाथ

Rajanath Singh: ‘कागज का है लिबास चरागों का शहर है, संभल-संभल...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi ऑपरेशन सिंदूरनंतर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी भुज एअरबेसवर पोहोचले. त्यांनी जवानांची भेट घेत त्यांचे भरभरून कौतुक केले....