Saturday, July 27, 2024
HomeनाशिकNashik News : लाचखोर बहिरम यांना 'इतक्या' दिवसांची पोलिस कोठडी

Nashik News : लाचखोर बहिरम यांना ‘इतक्या’ दिवसांची पोलिस कोठडी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-corruption Department) पथकाने काल शनिवार (दि.०५) रोजी सायंकाळी १५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना नाशिकचे तहसीलदार नरेशकुमार बहिरम (Naresh Kumar Bahiram) यांना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर आज (दि.०६) रोजी त्यांना विशेष न्यायालयात (Court) हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची म्हणजेच ०८ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे…

- Advertisement -

मणिपूरमध्ये हिंसाचार पुन्हा भडकला; एका जवानासह ६ जणांचा मृत्यू, काही भागात घरांची जाळपोळ

याबाबत अधिक माहिती अशी की, नरेशकुमार तुकाराम बहिरम (वय ४४, हुद्दा तहसीलदार नाशिक, रा. फ्लॅट नंबर ६०४, बी विंग, मेरिडियन गोल्ड, कर्मयोगी नगर, नाशिक) यांच्या कार्यालयाकडून नाशिक तालुक्यातील (Nashik Taluka) राजुर बहुला (Rajur Bahula) येथील जमिनी मालकांच्या जमिनीमध्ये मुरुम उत्खननाबाबत मूल्य नियमानुसार पाचपट दंड, स्वामित्वधन जागा भाडे मिळून एकूण रक्कम १ कोटी २५ लाख ०६ हजार २२० रुपयांच्या दंड आकारणीबाबत आदेश देण्यात आले होते.

IND vs WI : भारत-वेस्टइंडिज यांच्यात आज दुसरा T20 सामना

त्या आदेशाविरुद्ध जमिनी मालक यांनी उपविभागीय अधिकारी नाशिक यांच्याकडे अपील दाखल केली होती. त्याबाबत आदेश होऊन या प्रकरणाची पुन्हा फेर चौकशीसाठी नरेशकुमार बहिरम (तहसीलदार नाशिक) यांच्याकडे पाठवण्यात आले होते. या मिळकतीमधील उत्खनन केलेला मुरूम (Murum) त्याच जागेत वापर झाल्याचे जमिनी मालक यांनी त्यांच्या जबाबात नमूद केले होते.

काँग्रेसकडून लोकसभा मतदारसंघनिहाय समन्वयक जाहीर; पानगव्हाणे, आहेर, गायकवाड, डॉ.बच्छाव यांची नियुक्ती

याबाबत पडताळणी करण्यासाठी तहसीलदार बहिरम यांनी जमिनी मालक यांना त्यांच्या मालकीच्या राजुर बहुला तालुका जिल्हा नाशिक येथे स्थळ निरीक्षणवेळी बोलावले होते. पंरतु, जमिनीच्या मालक या वयोवृद्ध व आजारी असल्याने त्यांनी यातील तक्रारदार यांना त्यांच्या वतीने कायदेशीर कारवाईसाठी अधिकार पत्र दिल्याने ते लाचखोर बहिरम यांना स्थळ निरीक्षण वेळी भेटले असता त्यांनी तक्रारदार यांच्याकडे १५ लाख रुपयांच्या लाचेची (Bribe) मागणी केली.

Sinnar News : बिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी मुलगी जखमी

दरम्यान, त्यानंतर बहिरम यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने चौकशी केली असता त्यांनी लाच मागणी केल्याचे मान्य करत लाचेची रक्कम शनिवारी (दि.०५) रोजी स्वीकारल्याचे सांगितले आहे. यानंतर आता लाचखोर बहिरम यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून आणखी सखोल चौकशी (Inquiry) करण्यात येणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

लोकल ट्रेन सीरियल बॉम्बस्फोटाची धमकी, पोलिसांना आला फोन; मुंबईत एकच खळबळ

- Advertisment -

ताज्या बातम्या