Wednesday, April 30, 2025
Homeधुळेइरकॉन टोल वेच्या संचालकाची दिल्लीतून लाचखोरी

इरकॉन टोल वेच्या संचालकाची दिल्लीतून लाचखोरी

धुळे dhule । प्रतिनिधी

धुळे एसीबीच्या पथकाने (Dhule ACB team) इरकॉन सोमा टोल वे कंपनीतील (Ircon Soma Tollway Company) लाचखोरी चव्हाट्यावर आणली आहे. नवी दिल्लीचे संचालक (Director) प्रदिप कटीयार यांच्या सांगण्यावरुन 7 लाखांची लाच (bribe) स्विकारतांना कंपनीचे अकांउन्टींग व फायनान्स अधिकारी हरिश सत्यवली यांना रंगेहात (caught red-handed) पकडण्यात आले. आज दुपारी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी दोघांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

बंडखोर नगरसेवकांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह ?

इरकॉन सोमा टोल वे प्रा.लि. नवी दिल्ली या कंपनीने नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटी ऑफ इंडीया यांच्याकडुन दि.28 सप्टेंबर 2005 रोजी बांधा, चालवा व हस्तांतरीत करा, या तत्वावर करारनामा केला आहे. सदर कंपनीने कोरल असोसिएटस (उदयपुर, राजस्थान) या कंपनीस दि.22 ऑगस्ट 2022 रोजी नॅशनल हायवे क्र.3 (मुंबई-आग्रा) यावर असलेला चांदवड (जि.नाशिक) येथील टोल प्लाझाचे संपुर्ण व्यवस्थापन करण्याचा करारनामा केला आहे.

फरार अरुण गवळी अखेर गजाआडजिल्हा प्रशासनाच्या नाकावर टिच्चून कॉप्यांचा सुळसुळाट!

सदर कंपनीने तकारदार यांना दि. 25 ऑगस्ट 22 रोजी मुखत्यार पत्राव्दारे टोल प्लाझा, चांदवडचे संपुर्ण व्यवस्थापन व त्या संबंधी कागदोपत्राचे अधिकार प्रदान केले आहेत. तक्रारदार यांनी कोरल असोसिएटस कंपनीने चांदवड टोल प्लाझाच्या व्यवस्थापना बद्दलचे डिसेंबर 2022 ते जानेवारी 2023 चे रिअ‍ॅम्बर्समेंन्ट रक्कम अदा करण्यासाठी व कोरल असोसिएटसने धुळे लळिंग टोल प्लाझा व्यवस्थापनाचा ठेका मिळण्यासाठी भरलेली निविदा मंजुर करण्यासाठी तकारदार यांच्याकडे दि.19 फेब्रुवारी रोजी धुळे लळिंग इरकॉन सोमा टोल वेचे मुख्य कार्यालयात फायनान्स अधिकारी हरिष सत्यवली यांनी स्वतः साठी 2 लाख रूपये व इरकॉन सोमा टोल वे प्रा.लि. नई दिल्लीचे संचालक प्रदिप कटीयार यांच्यासाठी 5 लाख रूपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी आज दि.21 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे कार्यालयात तक्रार दिली होती.

पोलिसाची पत्नीला क्रूर वागणूक, सासरच्यांविरोधात तक्रार झाली दाखलBeauty Part 3 : हिवाळा ते उन्हाळा संक्रमणासाठी आपली त्वचा सज्ज करा…Breaking# मित्रावर हल्ल्याची भिती, न्यायालयात चॉपरची सोबती

या तक्रारीची आज पडताळणी केली असता त्यादरम्यान इरकॉन सोमा टोल वे प्रा. लि. नवी दिल्ली या कंपनीचे संचालक प्रदिप कटीयार यांनी मोबाईलव्दारे सांगितल्या वरुन कंपनीचे फायनान्स अधिकारी हरिष सत्यवली यांनी तक्रारदाराकडे स्वत: करिता 2 लाख व संचालक कटीयार यांच्याकरिता 5 लाख असे एकुण 7 लाखांची मागणी केली. तसेच लाचेची रक्कम त्यांनी इरकॉन सोमा टोल वे प्रा. लि. कंपनीच्या धुळे लळिंग टोल प्लाझा जवळील मुख्य कार्यालयात स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Makeup Part 4 # असा करा Self makeupगुलाबरावांच्या राजीनाम्यावर आज होणार निर्णय ?Breaking# मित्रावर हल्ल्याची भिती, न्यायालयात चॉपरची सोबती

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण तसेच राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, भुषण खलाणेकर, भुषण शेटे, गायत्री पाटील, रोहीणी पवार, रामदास बारेला, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर, प्रशांत बागुल, मकरंद पाटील यांनी केली आहे.

Makeup Part 5 : असा करा कियारा, कतरीना व आलिया सारखा नैसर्गिक मेकअप

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, १ मे रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.पंतप्रधान मोदी संपूर्ण दिवसभर मुंबईत असणार आहेत. त्यामुळं सुरक्षा व्यवस्थेत मोठी...