Monday, May 27, 2024
HomeनाशिकNashik Bribe News : लाचखोर तहसीलदार बहिरम यांच्याकडे सापडले 'इतके' घबाड

Nashik Bribe News : लाचखोर तहसीलदार बहिरम यांच्याकडे सापडले ‘इतके’ घबाड

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-corruption Department) पथकाने काल शनिवार (दि.०५) रोजी सायंकाळी १५ लाख रुपयांची लाच घेतांना नाशिकचे तहसीलदार नरेशकुमार बहिरम (Naresh Kumar Bahiram) यांना रंगेहाथ पकडले होते.

- Advertisement -

त्यानंतर आज (दि.०६) रोजी त्यांना विशेष न्यायालयात (Court) हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना ०८ ऑगस्ट म्हणजेच तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अशातच आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या चौकशीत लाचखोर तहसीलदार बहिरम यांच्या घरात लाखो रुपयांचे घबाड सापडले आहे.

Nashik News : लाचखोर बहिरम यांना ‘इतक्या’ दिवसांची पोलिस कोठडी

याबाबत अधिक माहिती अशी की, आज पहिल्या दिवशी एसीबीने केलेल्या चौकशीत लाचखोर तहसीलदार बहिरम यांच्या घरात सुमारे २५ लाख रुपये किंमत असलेले ४० तोळे सोने सापडले आहे. तसेच ४ लाख ८० हजार रुपयांची रोकड देखील बहिरम यांच्या घरात सापडली आहे. त्यानंतर आता बहिरम यांचे बँक खाते, बँक लॉकर, अन्य स्थावर मालमत्ता या सर्वांचीच झडती एसीबीकडून घेतली जाणार आहे. न्यायालयाने कोठडी सुनावताच एसीबीच्या पथकाकडून आणखी आक्रमकपणे तपास केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Sinnar News : बिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी मुलगी जखमी

लाचखोर तहसीलदार बहिरम यांच्या कार्यालयाकडून नाशिक तालुक्यातील (Nashik Taluka) राजुर बहुला (Rajur Bahula) येथील जमिनी मालकांच्या जमिनीमध्ये मुरुम उत्खननाबाबत मूल्य नियमानुसार पाचपट दंड, स्वामित्वधन जागा भाडे मिळून एकूण रक्कम १ कोटी २५ लाख ०६ हजार २२० रुपयांच्या दंड आकारणीबाबत आदेश देण्यात आले होते. त्या आदेशाविरुद्ध जमिनी मालक यांनी उपविभागीय अधिकारी नाशिक यांच्याकडे अपील दाखल केली होती. त्याबाबत आदेश होऊन या प्रकरणाची पुन्हा फेर चौकशीसाठी नरेशकुमार बहिरम (तहसीलदार नाशिक) यांच्याकडे पाठवण्यात आले होते. या मिळकतीमधील उत्खनन केलेला मुरूम त्याच जागेत वापर झाल्याचे जमिनी मालक यांनी त्यांच्या जबाबात नमूद केले होते.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘अमृत भारत स्टेशन योजने’चं लोकार्पण; महाराष्ट्रातील ‘या’ रेल्वेस्थानकांचा होणार कायापालट

त्यानंतर याबाबत पडताळणी करण्यासाठी तहसीलदार बहिरम यांनी जमिनी मालक यांना त्यांच्या मालकीच्या राजुर बहुला तालुका जिल्हा नाशिक येथे स्थळ निरीक्षणवेळी बोलावले होते. पंरतु, जमिनीच्या मालक या वयोवृद्ध व आजारी असल्याने त्यांनी यातील तक्रारदार यांना त्यांच्या वतीने कायदेशीर कारवाईसाठी अधिकार पत्र दिल्याने ते लाचखोर बहिरम यांना स्थळ निरीक्षणवेळी भेटले असता त्यांनी तक्रारदार यांच्याकडे १५ लाख रुपयांच्या लाचेची (Bribe) मागणी केली.

Video : पुणेगाव धरण ९२ टक्के भरले; उनंदा नदीत विसर्ग सुरू

दरम्यान, यानंतर बहिरम यांची एसीबीच्या पथकाने चौकशी केली असता त्यांनी लाच मागणी केल्याचे मान्य करत लाचेची रक्कम शनिवारी (दि.०५) रोजी स्वीकारल्याचे सांगितले. त्यानंतर लाचखोर बहिरम यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून सखोल चौकशी (Inquiry) सुरु असून त्यांच्याकडे आणखी काही घबाड सापडण्याची शक्यता आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

काँग्रेसकडून लोकसभा मतदारसंघनिहाय समन्वयक जाहीर; पानगव्हाणे, आहेर, गायकवाड, डॉ.बच्छाव यांची नियुक्ती

- Advertisment -

ताज्या बातम्या