Wednesday, March 26, 2025
Homeब्रेकिंग न्यूजब्रिजभूषण शरण सिंह यांचा लोकसभा निवडणुकीतून पत्ता कट; त्यांच्याऐवजी 'यांना' दिली उमेदवारी

ब्रिजभूषण शरण सिंह यांचा लोकसभा निवडणुकीतून पत्ता कट; त्यांच्याऐवजी ‘यांना’ दिली उमेदवारी

नवी दिल्ली | New Delhi
ऑलिम्पिक महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाच्या केलेल्या गंभीर आरोपांनंतर आणि आंदोलनानंतर भारतीय कुस्तीमहासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांना लोकसभेला पुन्हा तिकीट मिळणार का? अशी चर्चा सुरु होती. पण आता भाजपने कैसरगंज या त्यांच्या मतदारसंघातून ब्रिजभूषण शरण सिंह यांचे तिकीट कापत त्यांच्या मुलाला उमेदवारी जाहीर केली आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांचे पुत्र करणभूषण यांना कैसरगंज मतदारसंघातून तिकीट दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी भाजपने उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. परिपत्रक जारी करत भाजपने कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून करण भूषण सिंह यांना तिकीट दिल्याची माहिती सांगितली.

- Advertisement -

भाजपसाठी लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून कैसरगंज मतदारसंघ डोकेदुखी ठरला होता. देशातील ऑलिम्पिक महिला कुस्तीपटूंनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यांना परत उमेदवारी देणे भाजपवर उलटले असते. त्यामुळे त्यांची उमेदवारी जाणार, हे जवळपास निश्चित होते. आज अखेर ब्रिजभूषण यांच्याऐवजी त्यांच्या मुलाला तिकीट देण्यात आले आहे.

कोण आहेत करण भूषण सिंह
करण भूषण सिंह हे उत्तर प्रदेश कुस्ती संघाचे अध्यक्ष आहेत. भारतीय कुस्ती संघाचे उपाध्यक्षपदीही ते राहले आहेत. वडील ब्रिजभूषण सिंह यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी देखील उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. डबल ट्रॅप नेमबाजीत ते राष्ट्रीय खेळाडू राहिले आहेत. करण भूषण यांचे शिक्षण परदेशातून झाले आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियातून बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News: नाशिकरोड पोलिसांची चाळीस रिक्षांवर दंडात्मक कारवाई

0
नाशिकरोड | प्रतिनिधीनाशिकरोड पोलिसांनी रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उचलला असून सुमारे ४० रिक्षा चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त...