Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रऊसाचे क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणा - कृषीमंत्री दादा भुसे यांचे आवाहन

ऊसाचे क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणा – कृषीमंत्री दादा भुसे यांचे आवाहन

मुंबई । प्रतिनिधी

ऊसाचे क्षेत्र जास्तीत जास्त ठिबक सिंचनाखाली आणावे. साखर कारखान्यांनी त्यांच्या क्षेत्रातील ऊस क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्यासाठी प्रोत्साहनात्मक उपक्रम हाती घ्यावे. ऊसाच्या प्रजातीची निर्मिती करताना साखरेचे प्रमाण अधिक त्याचबरोबर अल्कोहोल निर्मितीसाठी योग्य प्रजातीच्या संशोधनासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन कृषीमंत्री दादा भुसे यांनी केले.

- Advertisement -

भुसे यांनी राज्यातील ऊस संशोधन प्रकल्पाचा कृषी मंत्र्यांनी आढावा घेतला. यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.धवन, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.संजय सावंत, वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे (व्हीएसआय) संचालक विकास देखमुख, पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे डॉ.रासकर, डॉ.शरद गडाख आदी यावेळी उपस्थित होते.

राज्यातील चारही कृषी विद्यापीठ आणि व्हीएसआय यांनी राज्यातील ऊस ऊपादन आणि संशोधनाबाबत दर तीन महिन्यांनी बैठक घ्यावी. याबाबत पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने समन्वय करण्याचे आवाहन कृषीमंत्र्यांनी केले.

राज्यात ऊस संशोधनासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत पाडेगाव ऊस संशोधन केंद्र आणि व्हीएसआय या संस्था अग्रणी आहेत. कोकणातही ऊसाखालील क्षेत्र वाढण्यास संधी असून त्या संदर्भात आज झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंबोली येथील हवामान ऊस उत्पादनासाठी अनुकुल असून त्या अनुषंगाने व्हीएसआयने तेथे ब्रिडींग सेंटर उभारले आहे. तेथे देशातील विविध वाणांची लागवड करण्यात आली असून संशोधनाचे कार्य सुरु आहे. या क्षेत्राचा वापर कृषी विद्यापीठांनी करावा. तसेच व्हीएसआयला चाचण्यांसाठी सहकार्य करण्याचे आवाहन भुसे यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या