Tuesday, November 26, 2024
Homeदेश विदेशVideo : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची बाधा; ट्विटरवरून दिली माहिती

Video : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची बाधा; ट्विटरवरून दिली माहिती

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही कोरोना व्हायरस झाल्याने खळबळ उडाली आहे. आपली कोरोना टेस्ट पोझिटीव्ह आल्याची माहिती स्वत: बोरिस यांनी ट्विटरवर प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओ द्वारे दिली.

ते म्हणाले, गेल्या २४ तासांपासून कोरोना सदृश्य लक्षणे आढळून येत होती. दरम्यान, आज मी टेस्ट करवून घेतली तर टेस्ट पोझिटीव्ह आली आहे. टेस्ट पोझिटीव्ह जरी आलेली असली  तरीदेखील आपण घरून काम  करणार आहोत.

- Advertisement -

मंत्रिमंडळाशी चर्चा असेल, काही महत्वाच्या बाबींसंदर्भात बैठकी असतील यासर्व व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणार असल्याचे त्यांनी व्हिडीओ मध्ये सांगितले आहे.

मी स्वत:ला घरात ठेवले आहे. त्यामुळे देशातील कुठल्याही नागरिकाने घराबाहेर पडू नये, या व्हायरसचा उत्तम उपाय म्हणजे घरात राहणे एवढाच आहे.

त्यामुळे घरात राहा…आनंदी राहा आणि जीवन जगा असे बोरिस या व्हिडीओमधून सांगत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या