Tuesday, May 21, 2024
Homeनगरदुर्दैवी! बारावीचा पेपर देण्यासाठी जाताना अपघात; सख्या बहीण-भावाचा मृत्यू

दुर्दैवी! बारावीचा पेपर देण्यासाठी जाताना अपघात; सख्या बहीण-भावाचा मृत्यू

श्रीगोंदा | Shrigonda

बारावीचा पेपर देण्यासाठी चाललेल्या दोघा सख्या बहीण भावाचा पिकअपने समोरून दिलेल्या जोरदार धडकेत अपघात होऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दौंड येथील भीमा नदीच्या पुलाजवळील जुन्या टोलनाक्यानजीक आज सकाळी घडली आहे.

- Advertisement -

श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलू येथील शिंदे कुटुंब शेती करून आपली उपजीविका भागवत पोटाला चिमटा घेत जे आपल्याला लहानपणी मिळाले नाही ते सर्व आपल्या मुलांना मिळावे यासाठी अहोरात्र कष्ट करत होते. त्यांची मोठी मुलगी अनुष्का गणेश शिंदे दौंड मेमोरियल या शाळेत शिक्षण घेत होती.

रणरागिणीने बिबट्याशी शर्थीची झुंज देत वाचविले पतीचे प्राण

सध्या १२ वीचे पेपर चालू आहेत. त्या पेपरसाठी सकाळी आपला भाऊ आदित्य गणेश शिंदे यांच्यासोबत निमगाव खलू वरून बहिणीचा पेपर देण्यासाठी दुचाकीवर सकाळी नऊ च्या सुमारास जात असताना पिकअपने समोरून दिलेल्या जोरदार धडकेत अपघात होऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दौंड येथील भीमा नदीच्या पुलाजवळील जुन्या टोलनाक्यानजीक आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

श्रीरामपूर एमआयडीसीत आगडोंब; केमिकल कंपनीला भीषण आग

अनुष्का गणेश शिंदे वय १६,व आदित्य गणेश शिंदे वय १४ रा निमगाव खलु,ता श्रीगोंदा अशी अपघातात मृत्यू पावलेल्या बहीण भावाची नावे आहेत. या मुलांचे वडील पेंटर काम व शेती करत असल्याची माहिती मिळाली आहे.

अतिशय गरीब कुटुंबातील या सख्या बहीण भावाचा असा करून अंत झाल्यामुळे निमगावसह परिसरावर शोककळा पसरली असून या दुर्दैवी घटनेबाबत हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा पुढील तपास दौंड पोलीस करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या