Monday, October 5, 2026
Homeक्राईमKarjat : भावाने केला सख्या बहिणींवर जीवघेणा हल्ला

Karjat : भावाने केला सख्या बहिणींवर जीवघेणा हल्ला

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

खाण्यासाठी शेतातून कांदा आणला, या कारणावरून सख्ख्या भावाने बहिणींवर कुर्‍हाडीच्या दांड्याने आणि लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात संबंधीत महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा तालुक्यात संताप व्यक्त होत आहे. राक्षसवाडी खुर्द येथे घडलेल्या घटनेत भावाकडून आणि नातेवाईकांकडून होत असलेल्या जीवघेण्या हल्ल्यातून वाचण्यासाठी भयभीत झालेल्या बहिणींनी तातडीने 112 क्रमांकावर फोन करून पोलिसांची गाडी बोलावून घेतली. पोलिसांचे वाहन वेळेत पोहोचल्यामुळेच या बहिणींची आरोपींच्या तावडीतून सुटका झाली, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

- Advertisement -

दरम्यान, या घटनेतील मुख्य आरोपीला बेड्या ठोकण्याऐवजी त्याच्या फिर्यादीवरून आम्हाला मारहाण करण्यात आल्याची तक्रार नोंदवून पोलीस मोकळे झाले रखमाजी रूपनर (सख्खा भाऊ), रूपाली रूपनर (भावाची पत्नी), रामदास पिंगळे, राहुल पिंगळे, आबा पिंगळे, बिरा कोळपे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

२०२६ चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर; तीन वैज्ञानिकांचा गौरव

0
दिल्ली । Delhi मानवी शरीरातील सर्वात गुंतागुंतीचा आणि गूढ अवयव म्हणजे 'मेंदू'. या मेंदूतील अब्जावधी चेतापेशींचे कार्य कसे चालते, त्या एकमेकांशी कसा संवाद साधतात आणि...