सुरगाणा | प्रतिनिधी | Surgana
सुर्यगड येथील माजी सरपंच मनोहर राऊत (४५) यांची हत्या त्यांच्याच साडूने केल्याची घटना आज पहाटे साडेचार वाजेच्या दरम्यान घडली आहे. तर मयत राऊत यांची पत्नी आणि संशयित आरोपीची पत्नी या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत…
याबाबत मयताची मुलगी रोशनी राऊत हिने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे की, माझे काका संशयित आरोपी भास्कर परशराम पवार (रा. पायरपाडा, पळसन) यांचे सर्वच कुटुंब हल्ली मुक्काम सुर्यगड हे नातेवाईक असल्याने व त्यांना त्यांचा चुलता हिरामण पवार हा त्रास देत असल्याने ते माझ्या वडिलांकडेच सहा महिन्यांपासून रहात होते.
पावसा अभावी परिस्थितीत गंभीर, अंतरजिल्हा चारा वाहतुकीवर बंदी
माझे हातरुंडी येथील मामा प्रकाश महाले यांनी सांगितले की, आता त्यांना मुळ गावी पायरपाडा येथे पाठवून द्या. तोच निरोप माझ्या वडिलांनी काका व मावशी यांना सांगितला. तुम्ही आता तुमच्या गावी निघून जा याचा राग आल्याने तो राग मनात धरून पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास काकांनी माझ्या वडिलांच्या उजव्या खांद्याच्या मानेजवळ, हनुवटी व छातीवर वार केले होते.
तर आई व मावशीच्या हातावर कुऱ्हाडीने वार करून जखमी केले. वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. भाऊ सुरेश पवार याने वडील भास्कर पवारला पकडून ठेवले होते. त्यांच्या हातात कुऱ्हाड होती. असे फिर्यादीत म्हटले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक नितीन कुमार गोकावे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पोलिसांनी संशयित आरोपीस ताब्यात घेतले असून पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनिल आहेर हे पुढील तपास करीत आहेत.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
अजितदादांशी वैचारिक मतभेद कायम; खासदार सुप्रिया सुळेंचे स्पष्टीकरण