Friday, June 21, 2024
Homeजळगावकिनगाव चुंचाळे रस्त्यावर वृद्धाची निर्घृण हत्या

किनगाव चुंचाळे रस्त्यावर वृद्धाची निर्घृण हत्या

चुंचाळे Chunchale ता.यावल प्रतिनिधी

- Advertisement -

तालुक्यातील किनगाव येथील एका वयोवृद्ध व्यक्तिचा (elderly person) अज्ञात व्यक्तिने धारधार हत्याराने गळा चिरून निर्घृण खून (Brutal murder) केल्याची घटनासमोर आली आहे .

भिमराव शंकर सोनवणे (वय ६० वर्ष) वाहनचालक राहणार किनगाव बु॥ यांचा रात्रीच्या सुमारास कुणीतरी अज्ञात व्यक्तीने धारधार हत्याराने गळा चिरून नंतर दगडाने ठेचुन खुन केल्याची घटनासमोर आली आहे .

चुंचाळे रस्त्यावरील किनगाव शिवारातील ढोल्या मोह नदीच्या पुलाखाली धारधार हत्याराने गळा कापुन दगडाने ठेचुन अत्यंत निर्घृण खुन झाल्याची प्राथमिक माहीती समोर आली असुन या घटनेमुळे किनगाव व चुंचाळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे .

घटनेचे वृत्त कळताच फैजपुर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर , पोलीस उपनिरिक्षक प्रदीप बोरूडे यांच्यासह पोलीस पयक घटनास्थळी पहोचले. घटनास्थळी श्वानपथकास बोलविण्यात आले होते . मागील चार ते पाच महीन्याच्या कालावधीत अशा प्रकारे खून झाल्याची तालुक्यातील ही चौथी घटना आहे.

या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात खुन झालेल्या व्यक्तिचा मुलगा विनोद भिमराव सोनवणे यांच्या फिर्यादी वरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा खून कुणी व कशासाठी केला हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या