Saturday, April 4, 2026
Homeदेश विदेशStock Market Crash: मुंबई शेअर बाजारात लाखो कोटींचा चुराडा; सेंसेक्स, निफ्टीमध्ये मोठी...

Stock Market Crash: मुंबई शेअर बाजारात लाखो कोटींचा चुराडा; सेंसेक्स, निफ्टीमध्ये मोठी घसरण

मुंबई | Mumbai
गेल्या काही आठवड्यांपासून अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात लष्करी संघर्ष सुरू आहे. या संघर्षामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. याचे तीव्र पडसाद आज भारतीय शेअर बाजारात पाहायला मिळाले. बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 1800 अंकांनी कोसळला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही 552 अंकांची मोठी घसरण झाली. सत्रादरम्यान ही घसरण अधिकच वाढली असून, सध्या सेन्सेक्स 2400 हून अधिक, तर निफ्टी 750 हून अधिक अंकांनी खाली व्यापार करत आहे.

सकाळी ९.१५ वाजता सेन्सेक्स २,३२६.४० अंशांच्या घसरणीसह ७६,८७६.०७ वर व्यवहार करत होता. तर निफ्टी ५० निर्देशांक ७८०.९० अंशांच्या घसरणीसह २३,६७० वर व्यवहार करत होता.

- Advertisement -

जागतिक बाजारात मोठा हाहाकार
तेलाच्या किमती वाढल्यानंतर यूएस फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट्समध्ये घसरण झाली आहे, ज्यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या मंदीबद्दल चिंता निर्माण झाली आहे. डाऊ जोन्सशी संबंधित फ्युचर्स ८४८ अंकांनी किंवा १.७९% घसरले. एस अँड पी ५०० फ्युचर्स १.७% घसरले आणि नॅस्डॅक १०० फ्युचर्स १.९% घसरले.

जपानच्या बाजारात ७% घसरण, दक्षिण कोरिया ८% घसरण, ऑस्ट्रेलिया ४% घसरण, सिंगापूर ३%घसरण झाली आहे.

कच्चा तेलाच्या किमतीत मोठी वाढ
युद्धाच्या तणावामुळे जागतिक स्तरावर इंधनाचा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, कच्च्या तेलाच्या किमतीत मागील आठवड्याच्या तुलनेत २० टक्क्यांची मोठी वाढ झाली असून, दर ११४ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. इंधनाचे वाढते दर भारतासारख्या आयातदार देशासाठी महागाई वाढवणारे ठरण्याची शक्यता आहे.

गोंधळाचे काय कारण?
इराणने म्हटले आहे की ते अमेरिका आणि इस्रायलच्या तळांवर हल्ले सुरूच ठेवतील. इतकेच नाही तर, इराणने प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेचे मित्रराष्ट्र असलेल्या आखाती देशांतील तेल शुद्धीकरण कारखाने आणि कंटेनर्सना लक्ष्य केले आहे. यापूर्वी इराणने हॉर्मुझच्या सामुद्रधुनी येथील मालवाहू जहाजांवरही हल्ले केले होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Simhastha Kumbhmela 2027 : कुंभमेळ्यासंबंधित विकास कामांची मुख्य सचिव राजेश अग्रवाल...

0
नाशिक | जिमाका वृत्तसंस्था Nashik सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर आणि परिसरात सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधा विषयक कामांना मुख्य सचिव राजेश अग्रवाल...