Tuesday, September 17, 2024
Homeब्रेकिंग न्यूजBudget 2024 : अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळालं? फडणवीसांनी थेट यादीच वाचली

Budget 2024 : अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळालं? फडणवीसांनी थेट यादीच वाचली

मुंबई | Mumbai

- Advertisement -

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी आज (दि.२३ जुलै) रोजी एनडीए सरकारचा (NDA Government) अर्थसंकल्प (Budget) सादर केला. या अर्थसंकल्पात एनडीएला सरकार स्थापन करण्यासाठी पाठबळ देणाऱ्या बिहार आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांवर मेहरबानी दाखवण्यात आली आहे. मात्र, या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या (Maharashtra) वाट्याला फारसे काही आले नसल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.

हे देखील वाचा : Union Budget 2024 : अर्थसंकल्पात शेती क्षेत्राला काय मिळालं? जाणून घ्या सविस्तर

त्यानंतर आता विरोधकांच्या या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले याची यादीचं फडणवीस यांनी वाचली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प, दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर, मुंबई मेट्रो, पुणे मेट्रो, नागपूर मेट्रो, मुळा मुठा नदी संवर्धन यासारख्या विविध उपक्रम आणि विकास योजनांसाठी काहीशे कोटींची तरतुद अर्थसंकल्पात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

हे देखील वाचा : Union Budget 2024 : अर्थसंकल्पात बिहार, आंध्रला रिटर्न गिफ्ट; महाराष्ट्राला मात्र ठेंगा, मविआच्या खासदारांचे आंदोलन

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पासाठी ६०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार योजनेसाठी ४०० कोटी, सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक कॉरिडॉरसाठी ४६६ कोटी, पर्यावरणपूरक शाश्वत कृषि प्रकल्पांसाठी ५९८ कोटी, महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी १५० कोटी, MUTP-३ साठी ९०८ कोटी, मुंबई मेट्रोसाठी १०८७ कोटी, दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरसाठी ४९९ कोटी, MMR ग्रीन अर्बन मोबिलिटीसाठी १५० कोटी, नागपूर मेट्रोकरिता ६८३ कोटी, नाग नदी पुनरुज्जीवनसाठी ५०० कोटी,पुणे मेट्रोसाठी ८१४ कोटी आणि मुळा मुठा नदी संवर्धनासाठी ६९० कोटींची तरतूद करण्यात आल्याचे फडणवीसांनी म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या