Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रबांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंना अटक

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंना अटक

पुणे |प्रतिनिधी| Pune

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व एबीआयएल ग्रुप ऑफ कंपनीचे प्रमुख अविनाश भोसले यांना डीएचएफएल- एस बँक कर्ज प्रकरणी सीबीआयने अटक केली आहे. डीएचएफएल- एस बँककर्ज प्रकरणात ही अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या महिन्यात अविनाश भोसले यांच्या घर आणि कार्यालयावर सीबीआयने छापेमारी केली होती. डीएचएफएल घोटाळा प्रकरणी सीबीआयने पुणे आणिमुंबईत अनेक ठिकाणी छापेमारी केली होती. काल गुरूवारी भोसले यांना सीबीआयने अटक केली आहे.

- Advertisement -

अविनाश भोसले यांचे प्रसिद्ध उद्योगपती आणि महाराष्ट्रातील बड्या राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध आहेत. काँग्रेस नेते विश्वजित कदम यांचे ते सासरे आहेत. तर ते नगर जिल्ह्यातील मूळ संगमनेरचे आहेत. सीबीआय अधिकार्‍यांकडून काही दिवसापूर्वी अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित या दोघांचीही चौकशी केली होती.अविनाश भोसले यांची यापूर्वी ईडी आणि सीबीआयने चौकशी केली होती.

सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डीएचएफल कर्ज प्रकरणात अविनाश भोसले यांना अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सीबीआयकडून अविनाश भोसले यांचा शोध सुरु होता. ईडीने यापूर्वी फेमा कायद्यांअंतर्गत अविनाश भोसले यांची चौकशी केली होती. तेव्हा 40.34 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. रिक्षावाला ते रियल इस्टेट किंग असा अविनाश भोसले यांचा प्रवास आहे. अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे सासरे आहे. कोट्यवधी रुपयांच्या एबीआयल ग्रुपचे सर्वेसर्वा भोसले आहे. भोसले हे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरवरून पुण्यात रोजगारच्या शोधात स्थलांतर झाले होते.

सुरुवातीला रिक्षा चालक म्हणून कामाला सुरुवात केली. त्यानंतर रिक्षा भाड्याने द्यायचा व्यवसाय केला सुरू केला. मग पाहता पाहता बांधकाम क्षेत्र आणि राज्याच्या बांधकाम विभागात ठेकेदारीच्या माध्यमातून लहान मोठी कंत्राटी काम मिळवली. 1995 ला सेना-भाजप युतीच्या काळात कृष्णा खोरे विकास महामंडळच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची काम मिळवले होते. भोसले यांचा सर्वच पक्षातील राजकीय व्यक्तींशी जवळीक आहे.पुण्यातील बाणेर परिसरात भोसले यांचा अलिशान व्हाइट हाऊस असा बंगला आहे.

त्यावर स्वतःच्या मालकीची तीन हेलिकॉप्टर उभी केली. पण, 2007 मध्ये अविनाश भोसलेच्या प्रगतीला ब्रेक लागला आणि कस्टम विभागाने फेमा कायद्यानुसार कारवाई केली. त्यानंतर जलसंपदा घोटाळ्याचे वादळ घोंगाऊ लागलं. अविनाश भोसले यांनी मार्ग बदलला. 2017 साली आयकर विभागाने भोसलेंच्या घरी छापा टाकल्यानंतर ते पुन्हा चर्चेत आले. 2020मध्ये ईडीने पुन्हा चौकशीचा ससेमिरा सुरू केला. तेव्हापासून भोसले ईडीच्या फेर्‍यात अडकले आणि काल सीबीआयने भोसले यांना अटक केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या