Tuesday, November 10, 2026
Homeनगरइमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरून पडून तरूणाचा मृत्यू

इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरून पडून तरूणाचा मृत्यू

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील जामखेड रस्त्यावरील लष्करी शाळेसमोरील फॅमिली क्वॉर्टर्सच्या इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झालेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आशिष गणपती गवळी (रा. माधवबाग, आलमगीर रस्ता, भिंगार) असे मृत तरूणाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 15 एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास आशिष हे इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरून अचानक खाली पडले.

- Advertisement -

या अपघातात त्यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली होती. घटनेनंतर तातडीने त्यांचे भाऊ नितेश गवळी यांनी त्यांना उपचारासाठी शहरातील खासगी रूग्णालयात दाखल केले. गेल्या चार दिवसांपासून त्याची मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र, रविवारी (19 एप्रिल) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी रूग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची ओवाळणी कोणाला?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवड गुरुवारी म्हणजेच भाऊबीजच्या दुसर्‍या दिवशी होणार आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बँकेत सहकार विकास आघाडीला स्पष्ट बहुमत...