बुलढाणा | Buldhana
राज्यातील बहुतांश भागात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. राज्यासह विदर्भाला मुसळधार पावसाने एकच दाणादाण उडवली आहे. रविवार रात्रीपासून सुरु असलेल्या दमदार पावसामुळे राज्यातील नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. याचा फटका अनेक गावांना बसला असून काही ठिकाणी गावांचा संपर्क तुटला आहे. अशीच एक धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे.
बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील खामगाव – नांदुरा रोडवरील सुटाळा गावातून जाणाऱ्या छोट्या नदीला अक्षरश: पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ही नदी प्रचंड पाण्याच्या प्रवाहाने दुथडी भरुन वाहु लागली आहे. दरम्यान या नदीच्या कडेला उभ्या असलेल्या एका इन्होवा कारला अक्षरशः डोळ्यादेखत नदीच्या पाण्याने वाहून नेलीय. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाल्याचे पहायला मिळत आहे.
नशीबच म्हणावे लागेल की या वाहनात कोणी बसलेले नव्हते नदीचा प्रवाह एवढा वाढला होता की, लगतच असलेले एक पानाचे दुकान देखील त्या चार चाकी वाहनाच्या बरोबर वाहून गेले आहे. बुलढाणा जिल्ह्याप्रमाणेच अकोल्यातही गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने जनजीवन पार विस्कळीत झालेय.
व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा