Saturday, May 4, 2024
Homeनगररात्रीचे भारनियमन रद्द करण्याची मागणी

रात्रीचे भारनियमन रद्द करण्याची मागणी

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील दुलेचांदगाव परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दररोज एका पाळीव प्राण्याची शिकार केली जात आहे.नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली असून वीज वितरण कंपनीने या परिसरातील रात्रीचे भारनियमन बंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी पाथर्डी येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सचिन माळी यांचेकडे केली आहे.

- Advertisement -

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या आठ दिवसांपासून दुलेचांदगाव परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. रात्रीचे भारनियमन सुरू असल्याने अंधाराचा फायदा घेत दररोज एका पाळीव प्राण्याचा बळी बिबट्याकडून घेतला जात आहे. शेतकर्‍यांना रात्री घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. भारनियमनामुळे बिबट्या वस्तीवर येऊन शेळ्या व कुत्र्यांची शिकार करत आहे.

अंधारात बिबट्याकडून मनुष्यावर हल्ला होण्याची शक्यता असून वीज महामंडळाने या परिसरातील रात्रीचे भारनियमन बंद करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.यावेळी उपसरपंच नवनाथ साप्ते,चेअरमन गोपीनाथ बांगर, बाबासाहेब गर्जे, विठ्ठल साप्ते, पोपट क्षीरसागर, श्रीधर पोंधे, विठ्ठल पोंधे, दिपक गर्जे, सोमनाथ मैड, उद्धव गर्जे, लेखराज गर्जे, गणेश गर्जे, सुनील साप्ते, संजय गावडे, सोमनाथ साप्ते, सुनील शेळके, गोविंद क्षीरसागर, गोरक्ष थोरात, आत्माराम राख यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

बिबट्याच्या भीतीने भयभीत झालेल्या ग्रामस्थांनी वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण साबळे यांची भेट घेऊन बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली असता बिबट्याचा पथ मार्ग शोधून पिंजरे लावले जातील. नागरिकांनी रात्री घराबाहेर पडू नये लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी.पाळीव प्राण्यांना बंदिस्त गोठ्यात बांधावे तसेच महावितरणला या परिसरात रात्रीचा वीज पुरवठा सुरू ठेवावा असे लेखी पत्र देवुन विनंती केल्याचे साबळे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या