नाशिक | प्रतिनिधी
बुलेट ट्रेनच ओझं आमच्या डोक्यावर नको, ही आधीपासून आमची भूमिका राहिली आहे. आता तर आमचे सरकार विराजमान झाले आहे. महाआघाडीतील मित्रपक्ष असेलेल्या राष्ट्रवादीची देखील हीच भूमिका आहे. त्यामुळे आता सरकार याबाबत योग्य तो निर्णय घेईल असे विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले. ते नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी खा. राऊत म्हणाले की, अनंतकुमार हेगडेंनी केलेल वक्तव्य गंभीर स्वरूपाचे असून भाजपने जनतेसोबत विश्वासघात केल्याचा आरोप याप्रसंगी त्यांनी केला.
जर देवेंद्र फडणीवस यांनी हे केले असेल तर फडणवीस आणि पूर्ण भाजप जनतेचा गुन्हेगार आहे. फडणवीसांनी हे नाकारलंय तर त्यांच्यावर विश्वास ठेवूया, तसं असेल तर भाजप खासदारांनी माफी मागावी.
मात्र यात काही तरी काळ बेरं आहे, राज्याशी बेईमानी झालीय का? तसे झाले असेल तर विधानसभेची पायरी चढण्याचा अधिकार फडणवीस आणि भाजपला नाही.
तसं झालं असेल राज्याच्या आकसापोटी झालंय असेच म्हणावे लागेल. राज्याची आर्थिक स्थिती खूप गंभीर असून गेल्या 5 वर्षात राज्यावरील कर्जाचा डोंगर वाढला आहे.
बुलेट ट्रेनच ओझं आमच्या डोक्यावर नको, ही आधीपासून आमची भूमिका राहिली असून राष्ट्रवादीची देखील हीच भूमिका आहे. आता तर सरकार याबाबत योग्य तो निर्णय घेतल्याशिवाय राहणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आरे प्रमाणेच नाणार प्रकल्पासंदर्भातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत कुणी मागणी करत असेल तर मुख्यमंत्री त्याचा विचार करतील.
खा. राऊत म्हणाले की, शिवसेनेच्या वाटेवर अनेक प्रमुख लोक आहेत. पंकजा मुंडे यांचा निर्णय 12 डिसेंबरला कळेल. मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना, कोणतं खातं कुणाला, याचा निर्णय मुख्यमंत्रीचं घेणार असल्याचेही ते याप्रसंगी म्हणाले.