त्र्यंबकेश्वर । प्रतिनिधी Trimbakeshwar
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये देखील आलेल्या भाविकांना आता अल्पदरात बुंदीच्या लाडूचा प्रसाद मिळणार आहे. विश्वस्त स्वप्नील शेलार आणि इतर मंदिरातील विश्वस्तांच्या पुढाकाराने आजपासून प्रसाद सेवा सुरू करण्यात आली आहे.
- Advertisement -
देवस्थान ट्रस्टच्या निर्णयाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आतील आवारात उत्तर आणि दक्षिण दिशेच्या गेट जवळ दोन ठिकाणी बुंदी लाडू प्रसाद विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे.