Wednesday, February 4, 2026
HomeनगरBunty Jahagirdar : बंटी जहागीरदार हत्येप्रकरणी अटक केलेल्या आरोपींना ६ जानेवारीपर्यंत पोलीस...

Bunty Jahagirdar : बंटी जहागीरदार हत्येप्रकरणी अटक केलेल्या आरोपींना ६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

श्रीरामपूर (प्रतिनिधी)

येथील बंटी जहागीरदार हत्येप्रकरणी अटक केलेल्या दोघांना ६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच आणखी काहीजण पोलिसांच्या रडारवर आले असून त्यांचीही चौकशी लवकरच सुरु होणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनी दिली.

- Advertisement -

दि. ३१ डिसेंबर रोजी दुपारी कब्रस्तानातील अंत्यविधी आटोपून अस्लम शेख ऊर्फ बंटी जहागीरदार मित्राच्या बाईकवर मागे बसून घरी परत जात असताना, सेंट लूक हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण गेट जवळ दोन हल्लेखोरांनी त्यांच्याजवळ असलेल्या पिस्तूल मधून बंटी जहागीरदार यांच्यावर गोळीबार केला होता. त्यात अहिल्यानगर येथे नेत असताना उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला होता.

YouTube video player

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चोवीस तासात बुधवारी रात्री उशिरा या गुन्ह्यातील कृष्णा अरुण शिनगारे (वय २३), रवींद गौतम निकाळजे (वय २३) या दोघांना कोपरगाव जवळून ताब्यात घेतले होते. त्यांना न्यायालयात हजर केले असता दि. ६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडे अजूनही सखोल विचारपूस करण्यात येत आहे.

गुन्ह्यात वापरलेले शस्त्र आरोपींनी कोठुन आणली? गुन्ह्याचा प्लॅन कसा केला? गुन्ह्यामध्ये अन्य कोणी अरोपी सामील आहेत किंवा कसे? व गुन्हा करण्यामागे नेमके कारण काय? याबाबींचा पोलीस सखोल तपास करत आहे. या प्रकरणी अजूनही काहीजण पोलिसांच्या रडारवर असून त्यांचीही लवकरच चौकशी सुरू करण्यात येणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Nashik Crime : पोलीस चौकीवर दगडफेक करणारे अटकेत

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik पोलीस चौकीवर (Police Chowki) दगड फेक करून फरार झालेल्या दोघा संशयितांना गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने सीसीसीटीव्हीच्या...