Monday, June 17, 2024
Homeक्राईमफ्लॅट फोडून रोख रक्कम, सात लाखाचा ऐवज चोरीस

फ्लॅट फोडून रोख रक्कम, सात लाखाचा ऐवज चोरीस

नगर शहराच्या मध्यवर्ती भागात भरदिवसा घडली घटना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

नगर शहराच्या मध्यवर्ती भागातील गुजर गल्ली येथील आनंदवन अपार्टमेंटमधील दुसर्‍या मजल्यावर फ्लॅट चोरट्यांनी भरदिवसा फोडून (Burglary) 11 हजाराची रोख रकमेसह सोन्याचे दागिने (Gold Jewelry) असा सात लाख नऊ हजार 250 रुपयांचा ऐवज चोरून (Theft) नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 24) रोजी दुपारी एक ते दोनच्या सुमारास घडली.

याप्रकरणी विशाल गांधी (वय 51 रा. आनंदवन अपार्टमेंट गुजर गल्ली, नगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) फिर्याद दिली आहे. गांधी यांचा आनंदवन अपार्टमेंटमध्ये दुसर्‍या मजल्यावर फ्लॅट आहे. चोरट्यांनी शुक्रवारी दुपारी एक ते दोनच्या दरम्यान फ्लॅटचा कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. घरातील सामानाची उचकापाचक करून घरातील 11 हजार रुपयांची रोख रक्कम तसेच एक लाख 80 हजार रुपये किमतीच्या 60 ग्रॅम वजनाच्या सोन्यांच्या बांगड्या, एक लाख 50 हजार रुपये किमतीचे 50 ग्रॅम वजनाचे सोन्यांची बिस्किटे, साठ हजार रुपये किमतीचे 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन पेंडल, 30 हजार रुपये किमतीचे दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले, तीस हजार रुपये किमतीच्या दहा ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या, 75 हजार रुपये किमतीचे 25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, 45 हजार रुपये किमतीचे 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, अठरा हजार रुपये किमतीचे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे कॉइन, पंधरा हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाची शंकरपाळी आणि बदाम, तीस हजार रुपये किमतीचे दहा ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या, 27 हजार रुपये किमतीचे नऊ ग्रॅम वजनाचे तीन जोडी टॉप्स, बारा हजार पाचशे रुपये किमतीचे 250 ग्रॅम वजनाचे चांदीचे शिक्के, तीन हजार 750 रुपये किमतीच्या 75 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या दोन नोटा, दोन हजार रुपये किमतीचा अडीच ग्रॅम वजनाचा मोतीहार, पाच हजार रुपये किमतीचे चार ग्रॅम वजनाचे हिरेजडीत कानातली जोडी, शिवकालीन नाणे 30 नग असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. घरात चोरी (Theft) झाल्याची माहिती मिळताच विशाल गांधी यांनी कोतवाली पोलीस ठाणे (Kotwali Police Station) गाठून या घटनेची फिर्याद दिली आहे. कोकाटे या करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या