धुळे । Dhule
तालुक्यातील गोंदुर येथे चोरट्यांनी एकाच रात्री ठिकाणी घरफोडी केली. रोकडसह दीड लाखांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मयुर संजय पाटील (वय 22 रा. गोंदूर) या शेतकर्यांने पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार, ते कुटुंबियांसह नगाव येथे मावस बहिणीकडे आलेले होते. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. ही संधी साधत चोरट्यांनी काल रात्री त्यांच्या कडी-कोयंडा व कुलूप तोडून आत प्रवेश केला. घर बांधकाम सुरू असलेल्या घरात आणून ठेवलेले 50 हजारांची रोकड, 30 हजारांचे 12 तोळ्याची सोन्याची माळ, 12 हजारांचे 8 ग्रॅमचे मंगळसुत्र, 9 हजारांचे 7 ग्रॅमचे कानातील टोंगल, 7 हजारांचे सात भारचा चांदीचा गोप, 11 हजार रूपये किंमतीचे अकरा भारच्या चांदीच्या पायातील साखळ्या असा एकुण 1लाख 19 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.
तसेच चोरट्यांनी पाटील यांच्या घराजवळील दत्तात्रय रामदास माळी याच्याकडेही घर फोडी केली. तेथून 7 हजार रूपये रोख व 20 हजार रूपये किंमतीच्या अर्धा ग्रॅमच्या 4 अंगठ्या, दीड ग्रॅमच्या कानातील बाळ्या,दोन ग्रॅमचे ओम पान, चांदीचे जुने डाग असा ऐजव लंपास केला. याबरोबरच गावातील सुधीर कैलास पाटील यांचे पार्थ मेडीकल स्टोर्अस दुकानही चोरट्यांनी फोडले. गल्लातून 7 हजारांची रोकड चोरून नेली. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून चोर्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पोलिस प्रशासनाकडून यावर कठोर पावले उचलण्याची गरज असून ग्रामीण भागातही चोर्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.