Tuesday, April 29, 2025
Homeनाशिकनाशिक शहरात तीन ठिकाणी घरफोड्या; लाखोंचा ऐवज लंपास

नाशिक शहरात तीन ठिकाणी घरफोड्या; लाखोंचा ऐवज लंपास

नाशिक। प्रतिनिधी Nashik

शहरात चाेरट्यांनी विविध तीन ठिकाणी घरफाेड्या करुन तब्बल साडेनऊ लाखांचा ऐवज चाेरुन नेला आहे. याबाबत गुन्हे नाेंदविण्यात आले असून सीसीटीव्ही फूटेजनुसार चाेरट्यांचा माग काढला जात आहे.

- Advertisement -

वैलनकेदी जॉन फर्नांडिस (रा. शिवांजली रो-हाऊस, मोतीवाला कॉलेजसमोर, शिवशक्तीनगर, ध्रुवनगर) यांच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (दि. ११) मध्यरात्री त्यांच्या बंद घराची कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील लोखंडी कपाटातून २ लाख ४४ हजारांचा ऐवज चोरून नेला. यात २७ हजारांची रोकड, ७ हजारांचा टॅब, ६० हजारांचा सोन्याचे दागिने, दीड लाखांचा सोन्याचा नेकलेस चोरून नेला.

तर, या शिवांजली रो हाऊस कॉलनीतील दुसऱ्या क्रमांकाच्या ज्ञानेश्वर महादू महाजन यांच्या बंद रो हाऊसच्याही दाराचा कडीकोयंडा तोडून १ लाख ६३ हजार ४५५ रुपयांचा मुददेमाल चोरून नेत घरफोडी केली. यात १८ हजारांची रोकड, ८० हजार ९७५ रुपयांचे सोन्याची पोत, पेंडन, ३४ हजार १८० रुपयांच सोन्याचे जोड, ३० हजारांचे सोन्याचे टॉप्स, पेनड्राईव्ह असा एकूण ४ लाख ७ हजार ४५५ रुपयांचा मुददेमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे. एकाच रांगेतील दोन रो-हाऊसची घरफोडीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भिंतीचे वातावरण आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबडच्या सिद्‌धटेक नगर येथील राम किसन काळदाते (रा. सप्तशृंगी अपार्टमेंट, शिवनेरी कॉलनी) यांच्या फिर्यादीनुसार, ८ ते ११ तारखेदरम्यान त्यांचा फ्लॅट बंद असताना, अज्ञात चोरट्यांनी अपार्टमेंटमधील ७ नंबरच्या फ्लॅटच्या सेफ्टी डोअरचे लॉक, तसेच आतील दरवाजाचे लॉक तोडले. त्यानंतर घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून चोरट्यांनी ४ लाख ७९ हजारांचे दागिने, रोकड चोरून नेली. यात ३ लाख ८० हजारांची रोकड, ३० हजारांचे सोन्याची पोत, २१ हजारांचे सोन्याचे गंठण, २१ हजारांचे सोन्याचे झुबे, ६ हजारांची सोन्याची बाळी असा ऐवज चोरून नेत घरफोडी केली. अंबड पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Congress News : संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा, काँग्रेसचे पंतप्रधान मोदींना पत्र

0
दिल्ली । Delhi जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना...