Saturday, May 18, 2024
Homeनगरबंगला फोडून 16 लाखांचा ऐवज लंपास

बंगला फोडून 16 लाखांचा ऐवज लंपास

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बालिकाश्रम रस्त्यावरील बंगल्यावर चोरट्यांनी शुक्रवारी पहाटे डल्ला मारून तब्बल 30 तोळ्याचे सोन्यांचे दागिने व चार लाख 60 हजाराची रोख रक्कम असा 15 लाख 73 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. पहाटे एक ते चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून याप्रकरणी रात्री उशिरा तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. नोबेल हॉस्पिटलचे सीईओ विजय माणिकराव निकम (वय 58 रा. ओम बंगला, साई कॉलनी, बालिकाश्रम रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

चोरट्यांनी शुक्रवारी पहाटे निकम यांचा ओम बंगल्याच्या मुख्य दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश केला. घरातील सामानाची उचकापाचक करून सोन्याचे मंगळसूत्र, बांगड्या, अंगठ्या, कर्णफुले, चैन तसेच हिर्‍याचे मंगळसूत्र असा सुमारे 30 तोळ्याचा ऐवज व चार लाख 60 हजार रूपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. पहाटे चार वाजता चोरीचा प्रकार लक्षात आला.

शुक्रवारी रात्री उशिरा निकम यांनी यासंदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या