Saturday, November 9, 2024
Homeनगरकुटुंब बाहेरगावी जाताच चोरट्यांनी फ्लॅट फोडला

कुटुंब बाहेरगावी जाताच चोरट्यांनी फ्लॅट फोडला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पुणे (Pune) येथे नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी गेलेल्या व्यक्तीचा फ्लॅट फोडून चोरट्यांनी रोख रक्कम, सोन्याचे दागिने (Gold Jewelry) असा 53 हजाराचा ऐवज चोरून नेला. बालिकाश्रम रस्त्यावरील धर्माधिकारी मळ्यात 12 मे रोजी सकाळी नऊ ते 13 मे रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी 14 मे रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा (Burglary) गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

बाबुराव साहेबराव हुशंगाबादे (वय 48) यांनी फिर्याद दिली आहे. ते धर्माधिकारी मळ्यातील दुर्वाकुर सोसायटीत गुलाब पांडुरंग बोरूडे (रा. बोरूडे मळा) यांच्या फ्लॅटमध्ये राहतात. बाबुराव यांच्या पुणे (Pune) येथील नातेवाईकांच्या घरी 16 मे रोजी कार्यक्रम असल्याने ते त्या कार्यक्रमासाठी 12 मे रोजी सकाळी कुटुंबासह गेले होते. जाताना त्यांनी कडी कुलूप लावून फ्लॅट बंद केला होता. दुसर्‍या दिवशी 13 मे रोजी रात्री साडेआठ वाजता त्यांना फ्लॅट मालक बोरूडे यांनी फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तुटले असल्याचे सांगितले. माहिती मिळताच बाबुराव हे नगरमध्ये आले असता त्यांनी पाहणी केली.

सामानाची उचकापाचक झाल्याचे त्यांना दिसून आले. कपाटातील पाच हजाराची रोकड, 20 ग्रॅमच्या चार अंगठ्या, पाच ग्रॅमचे कानातील टॉप, तीन ग्रॅमची कानातील रिंग, सहा ग्रॅमचे दोन सोन्याचे कॉईन असे सुमारे साडेतीन तोळ्याचे दागिने (Gold Jewelry) असा एकुण 53 हजाराचा ऐवज चोरीला गेल्याचे लक्ष्यात आले. बाबुराव यांनी तोफखाना पोलिसांना (Topkhana Police) माहिती देत फिर्याद दिली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या