Saturday, July 27, 2024
Homeनगरघरफोडी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

घरफोडी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील चार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 2 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

- Advertisement -

लाल्या ऊर्फ राजेंद्र ईश्वर भोसले (28, ता. कर्जत), निकाजी अभिमान ऊर्फ जिन्या काळे (32, रा. आष्टी, जिल्हा बीड), संतोष पोपट आंधळे (42, रा. आंधळेवाडी, ता. आष्टी) यांना ताब्यात घेतले असून कान्हा उध्दव काळे (रा. आष्टी, जिल्हा बीड याचा शोध सुरू आहे.

फिर्यादी मुरलीधर गहिणीनाथ गोलेकर (रा. गोलेकर लवण, खर्डा , ता. जामखेड) हे घरात झोपलेले असताना अनोळखी चार व्यक्तीने किचनचा दरवाजा तोडुन आत प्रवेश करुन फिर्यादी यांना गजाने मारहाण करून 2 लाख 4 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल चोरूण नेला होता. याबाबत खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा राजेंद्र भोसले याने केल्या असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार भोसले यास बीड येथून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. ही कारवाई गुन्हे शाखेतील सोपान गोरे, रवींद्र कर्डिले, गणेश भिंगारदे, संतोष लोढे, विजय ठोंबरे, फुरकान शेख, अमोल कोतकर, किशोर शिरसाठ, भाऊसाहेब काळे, मच्छिंद्र बर्डे, बाळासाहेब गुंजाळ, सागर ससाणे, विजय धनेधर, अर्जुन बडे व अरुण मोरे यांच्या पथकाने केली. आरोपी राजेंद्र ईश्वर भोसले हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द नगर, बीड व नाशिक जिल्ह्यात दरोडा, खुनासह दरोडा, दरोडा तयारी, जबरी चोरी, घरफोडी व खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरुपाचे एकुण 11 गुन्हे दाखल आहेत. तर आरोपी निकाजी अभिमान काळे विरुध्द बीड, बुलढाणा व सातारा जिल्ह्यात दरोडा व घरफोडी असे गंभीर स्वरुपाचे 3 गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या