Tuesday, November 10, 2026
HomeनगरCrime News : घरफोडीत पाच लाखांचा ऐवज लंपास

Crime News : घरफोडीत पाच लाखांचा ऐवज लंपास

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील गुलमोहर रोड परिसरातील किर्लोस्कर कॉलनी येथे घरफोडी करून चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह तब्बल पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. घराच्या मागील बाजूच्या खिडकीची ग्रील तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. ही घटना 6 नोव्हेंबरच्या रात्री साडेदहा ते 7 नोव्हेंबरच्या सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान घडली.

- Advertisement -

याप्रकरणी मनोज नागेश अडिगोपुला (वय 32, रा. किर्लोस्कर कॉलनी, गुलमोहर रोड, अहिल्यानगर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मनोज अडिगोपुला हे किर्लोस्कर कॉलनी परिसरात भाड्याच्या खोलीत राहतात. 6 नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजल्यापासून 7 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या मागील बाजूच्या खिडकीची ग्रील तोडली. त्यानंतर घरात प्रवेश करून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.

चोरट्याने दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन कानातील दागिने, पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट, तीन व सात ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, 50 ग्रॅम वजनाची दोन चांदीची बिस्किटे, 100 ग्रॅम वजनाचे एक चांदीचे बिस्कीट, चांदीची चैन व दोन कडे असा ऐवज लंपास केला. याशिवाय तीन लाख 72 हजार रुपयांची रोख रक्कमही चोरट्याने चोरून नेली. चोरीस गेलेल्या ऐवजाची एकूण किंमत पाच लाख रुपये आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य, पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

Crime News : नगरमध्ये फटाके फेकण्यावरून दोन गटांत राडा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर सुतळी बॉम्ब पेटवून एकमेकांच्या दिशेने फेकण्याच्या प्रकारातून फुलसौंदर चौकात दोन गटांत जोरदार वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना रविवारी रात्री...