Tuesday, November 3, 2026
HomeनगरCrime News : घरफोडी करणारी जालना जिल्ह्यातील टोळी जेरबंद

Crime News : घरफोडी करणारी जालना जिल्ह्यातील टोळी जेरबंद

एलसीबीची कामगिरी || 17 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने चोरणार्‍या जालना जिल्ह्यातील टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. कार आणि दुचाकीवरून येत घरफोडी करणार्‍या या टोळीतील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार, दुचाकी आणि 60 ग्रॅम सोने असा एकूण 17 लाख 40 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. टाकळी ढोकेश्वर येथील खिलारी वस्तीवर राहणार्‍या मंगल संतोष गोरडे यांच्या घरात 25 ऑक्टोबर रोजी घरफोडी झाली होती. तीन लाख नऊ हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या.

- Advertisement -

त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड, अनंत सालगुडे, अंमलदार अतुल लोटके, निळकंठ कारखेले, फुरकान शेख, अभिजीत अरकल, भिमराज खर्से, सागर ससाणे, प्रशांत राठोड आदींचे पथक स्थापन केले होते. पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. दरम्यान, रविवारी (1 नोव्हेंबर) मिळालेल्या माहितीनुसार, हा गुन्हा कार्तिक प्रकाश आव्हाड (वय 20 रा. घनसांगवी, जि. जालना) याने साथीदारांच्या मदतीने केल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी कार्तिक आव्हाड याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे चौकशी केली असता गणेश प्रकाश आव्हाड, अर्जुन गणपत गायकवाड, अभिषेक उर्फ अभि प्रकाश लोमटे, पूजा प्रकाश आव्हाड आणि सुमित विनायक पांजगे या साथीदारांची नावे समोर आली. त्यानंतर पोलिसांनी गणेश प्रकाश आव्हाड (वय 20, रा. घनसांगवी, जि. जालना) आणि अभिषेक उर्फ अभि प्रकाश लोमटे (वय 21, रा. कळंब, जि. धाराशिव) यांनाही ताब्यात घेतले. या प्रकरणातील अर्जुन गायकवाड, पूजा आव्हाड आणि सुमित पांजगे हे पसार आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात 13.05 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महाराष्ट्रात 2026-27 ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली असून, 1 नोव्हेंबरपर्यंत 124 साखर कारखान्यांकडून 77.07 लाख क्विंटल साखर उत्पादन करण्यात आले आहे. यात...