Friday, September 11, 2026
Homeक्राईमCrime News : बंद घर फोडून सव्वा तीन तोळ्याचे दागिने लंपास

Crime News : बंद घर फोडून सव्वा तीन तोळ्याचे दागिने लंपास

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील कोर्ट गल्ली भागात घरफोडीची घटना घडली असून, अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून सुमारे सव्वा तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात बुधवारी (13 मे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात मंगल भाऊसाहेब फुलसौंदर (वय 66, रा. विठ्ठल मंदिर शेजारी, कोर्टगल्ली, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. सदरची घटना 10 मे रोजी दुपारी चार ते 11 मे रोजी सकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडली आहे.

- Advertisement -

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंगल फुलसौंदर या कोर्टगल्लीतील विठ्ठल मंदिराजवळ राहतात. त्या 10 मे रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास घराला कुलूप लावून बाहेर गेल्या असताना चोरट्यांनी ही संधी साधली. चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे स्क्रू काढून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटाचा कप्पा कशाच्या तरी साहाय्याने उचकटून त्यातील मौल्यवान दागिने लंपास केले.

यामध्ये एक तोळ्याचे सोन्याचे मिनीगंठण, एक तोळ्याचे सोन्याच्या मण्यांचा सर, एक तोळ्याचे सोन्याचे तीन पदरी गंठण आणि तीन ग्रॅमची सोन्याची अंगठी असा एकूण एक लाख 32 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. पुढील तपास पोलीस अंमलदार अडसरे करत आहे.

ताज्या बातम्या

टिप्पर

Nashik Crime News: नाशकात लेडी ब्लॅकमेलरची दहशत; सीएला तब्बल १० लाखांचा...

0
नाशिक | प्रतिनिधीआर्थिक फसवणूक व्यवहारातून आणि त्यानंतर पोलिसांत खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी देत सीए (चार्टर्ड अकाउंटंट) कडून लाखोंची खंडणी उकळणाऱ्या एका हायप्रोफाईल महिलेचा पराक्रम...