Saturday, April 26, 2025
Homeनगरघराचे कुलूप तोडले; 87 हजारांचा ऐवज चोरीस

घराचे कुलूप तोडले; 87 हजारांचा ऐवज चोरीस

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात उचकापाचक करून सोन्यांचे दागिने व रोख रक्कम असा 87 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि.30) रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजता घडली. याप्रकरणी राजेश वंजारे (वय 36, रा. तारकपूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. 30 रोजी सकाळी 9 वाजता फिर्यादी हे नेहमीप्रमाणे घराला कुलूप लावून कामाला गेले होते. त्यांची आई भिंगार येथे धार्मिक कार्यक्रमासाठी गेली होती. फिर्यादी सायंकाळी घरी आले असता, त्यांना घराच्या किचनची खिडकी उघडी दिसली.

- Advertisement -

मागील स्टोरूमकडून घरामध्ये आत जाण्यासाठी ते गेले असता त्यांना मागील दरवाजाचे उघडले दिसले. त्यानंतर घरात पाहिले असता घरात उचकापाचक केलेली दिसली. लोखंडी कपाटात सोन्यांचे दागिने व रोख रक्कम ठेवलेला डब्बा दिसून आला नाही. त्यामुळे घरात चोरी झाल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले. 5 हजारांची रोख रक्कम, 15 हजार रूपये किंमतीची एक तोळ्याची सोन्यांची पोत, 15 हजाराची एक तोळ्याची सोन्यांची अंगठी, 15 हजाराचे एक तोळ्याचे सोन्यांचे मंगळसूत्र, 15 हजाराचे सोन्यांचे कानातले, 7 हजाराची अर्धा तोळ्याची डोरमाळ, 7 हजाराचे अर्धा तोळ्याचे डोरले, 7 हजाराचे अर्धा तोळ्याची नथ, 1 हजाराचे चांदीचे कडे असा एकूण 87 हजाराचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...