Friday, June 21, 2024
Homeनगरटोळक्याकडून तरुणावर बुर्‍हाणनगरमध्ये हल्ला

टोळक्याकडून तरुणावर बुर्‍हाणनगरमध्ये हल्ला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

नगर तालुक्यातील बुर्‍हाणनगर शिवारात एका तरुणावर टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना काल सोमवारी सायंकाळी घडली. पुष्कर शेलार (पूर्ण नाव नाही) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. हल्ल्यात तो जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला असल्याची प्राथमिक माहिती असून जखमी तरुणाचा जबाब नोंदविल्यानंतर हल्ल्याचे कारण समोर येईल असे भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांनी सांगितले. शेलार व स्थानिक तरुणाचे यापूर्वी वाद झाले असल्याची माहिती समजली. याच वादातून काही तरुणांनी शेलार यांना सोमवारी सायंकाळी बुर्‍हाणनगर- भिंगार रस्त्यावर गाठले. तेथे त्यांच्यावर हल्ला केला. त्यात ते जखमी झाले असून स्थानिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान घटनेची माहिती मिळतात राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍यांसह हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालय धाव घेतली होती. जखमी तरुणाचा जबाब नोंदविल्यानंतर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे सहायक निरीक्षक राजगुरू यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या