Tuesday, November 26, 2024
Homeधुळेमातोश्रीच्या पाठीत खंजीर खुपसणार्‍यांना मातीत गाडा

मातोश्रीच्या पाठीत खंजीर खुपसणार्‍यांना मातीत गाडा

धुळे । dhule प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांना राजकीय वारसा (Political legacy) नव्हता अशा उपेक्षीत वर्गाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी चेहरा दिला. पानटपरी चालविणार्‍यापासुन रिक्षावाल्यापर्यंत सामान्यांना सत्तेच्या शिखरावर बसविले. मात्र त्याच शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे पूत्र मुख्यमंत्री झाल्यानंतर 25 वर्ष ज्यांना राज्याच्या कानाकोपर्‍यात शिवसेनेने सत्ता बहाल केली अशांनी भारतीय जनता पक्षाला (Bharatiya Janata Party) हाताशी धरून शिवसेनेमध्ये बंडखोरी (Rebellion in Shiv Sena) करत 53 जण बाहेर पडले. या सगळ्यांना येत्या विधानसभा लोकसभा निवडणूकीत अद्दल घडविण्यासाठी शिवगर्जना संवाद यात्रा (Shivgarjana Samvad Yatra) सुरू झालेली आहे. आपण सगळेजण पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार करून सामान्य जनतेची सेवेचे व्रत कायम सुरू ठेवु या असे भावनिक आवाहन शिवसेना नेते व माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी केले. धुळे येथे शिवगर्जना यात्रेत ते शिवसैनिकांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.

- Advertisement -

उध्दव बाळासाहेब ठाकरे,शिवसेना पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रात शिवगर्जना अभियान सुरू झालेे आहे.या अभियानाचा आज दुसर्‍या दिवशी धुळे येथे मोटार सायकल रॅली व कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला.धुळ्याच्या छत्रपती शाहु नाट्य मंदिरात या मेळाव्यास अनंत गिते यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी शिवसेना उपनेत्या संजना घाडी, विधानसभेचे माजी उपसभापती विजय औटी, युवासेना सचिव वरूण सरदेसाई, धुळे जिल्हा संपर्कप्रमुख अशोक धात्रक, धुळे जिल्हा महिला संपर्कप्रमुख उषा मराठे, उत्तर महाराष्ट्र महिला संपर्कप्रमुख शुभांगी पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.

या शिवगर्जना अभियानात प्रियंका जोशी, तालुका प्रमुख नाना वाघ,संपर्कप्रमुख अशोक धात्रक, संजना घाडी, विजय औटी, वरूण सरदेसाई वअनंत गिते यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी विविध पक्षसंघटनेच्या मान्यवरांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यामध्ये सफाई आक्रोश मोर्चाचे अध्यक्ष व वाल्मिकी समाजाचे प्रमुख लक्ष्मण चांगरे,अखिल भारतीय सफाई कर्मचारी कल्याण संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंद जावेकर,सफाई कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश विसनारीया, धुळे शहरातील मुस्लिम समाजाचे धाीचे कार्यकर्ते जावेद बिल्डर, भिमकायदा सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंद शिंदे, देवपुर परिसरातील मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते व कम्यनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते इरफार मनियार, मोहम्मद सलीम अन्सारी, मोहम्मद मेहमूद खान,मोहम्मद सलीम शेख तसेच आदिवासी समाजाचे कार्यकर्ते साळवे, निवृत्त अभियंता श्री.साळुंखे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

याप्रसंगी युवासेनेच्या 500 मोटर सायकल स्वारांसह शहरातील रेल्वे स्टेशन ते आग्रारोड नगरपट्टी मार्गे भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली. या मेळाव्यास युवासेना विभागीय सचिव विलास कवाीया, विस्तारक शंभू बागुल, सहसंपर्कप्रमुख धुळे महेश मिस्तरी, सहसंपर्कप्रमुख शिंदखेा ग्रामीण हिलाल माळी, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, ग्रामीण जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, माजी आ.प्रा.शरद पाटील, जिल्हा समन्वयक कैलास पाटील,किशोर वाघ, भरत राजपूत, जिल्हा संघटक मंगेश पवार,उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, हिम्मत साबळे, शानाभाऊ सोनवणे, परशुराम देवरे, पंकज गोरे,हेमा हेमाडे, जयश्री वानखेे, माधुरी देसले उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महानगरप्रमुख धिरज पाटील यांनी केले. तर आभार सुशिल महाजन यांनी मानले.मोटार सायकल रॅलीसाठी युवासेनेचे जिल्हा युवा अधिकारी हरीष माळी, शहर युवा अधिकारी सिध्दार्थ करनकाळ,उपजिल्हाधिकारी कुणाल कानकाटे यांनी परिश्रम घेतले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या