Sunday, March 30, 2025
Homeदेश विदेशभीषण अपघात! जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, ३८ जखमी

भीषण अपघात! जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, ३८ जखमी

सुरत | Surat

गुजरातमध्ये जवानांना घेऊन जात असलेल्या बसचा भीषण अपघात झाला. पंचमहल जिल्ह्यात झालेल्या या अपघातात राज्य राखीव पोलीस दलाचे ३८ जवान जखमी झाले आहेत. पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा याबाबत माहिती दिली. या घटनेत कोणतीही जिवितहानी झालेली नाही.

- Advertisement -

पोलिसांनी सांगितले की, एसआरपी जवानांना घेऊन जात असलेली बस पंचमहल जिल्ह्यात उलटली. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झालेली नाही. सर्व ३८ जवान जखमी झाले आहेत. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

दुर्घटनेवेळी बसमध्ये ५० जवान होते. त्यापैकी ३८ जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नेण्यात आलं आहे. २९ जणांना डिस्चार्ज दिला आहे. तर ९ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एसआरपीचे जवान फायरिंगचा सराव करून परत येत असताना ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं. बसचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अभूतपूर्व प्रतिसादात ‘देशदूत पंचवटी अनेक्स प्रॉपर्टी एक्स्पो’ची सांगता

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik पंचवटीच्या नवीन आडगाव नाका, जत्रा चौफुली, रासबिहारी रोड, कोणार्क नगर, बळी मंदिर, छत्रपती संभाजी नगर नाका परिसरातील नागरिकांच्या अभूतपूर्व प्रतिसादाने तीन...