Thursday, June 20, 2024
Homeमुख्य बातम्यामुंबईत बर्निंग बसचा थरार

मुंबईत बर्निंग बसचा थरार

मुंबई | Mumbai

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी मुंबईत शिवसेना भवन (ShivSena Bhavan) समोर एका प्रवासी वाहनाला (passenger vehicles) आग लागल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या अंधेरी (Andheri) पूर्व भागातील चकाला परिसरामध्ये धावत्या बेस्ट बसला (Best bus) आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.

Ravindra Jadeja ला ‘ती’ चूक नडली; ICC ने केली कडक कारवाई

यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, अंधेरी येथील आगरकर चौकातून (Agarkar Chowk) साकीनाकाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर चकाला या ठिकाणी असलेल्या बसला भीषण आग (Fire) लागली. बसमध्ये ५० ते ६० प्रवासी प्रवास करत होते. घटना घडल्यानंतर प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली. 

आग लागल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे (fire brigade) तीन ते चार बंब घटनास्थळी पोहोचले, अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

या बेस्ट बसला आग लागल्यानंतर वाहतूक पोलिसांनी (Police) प्रवाशांना सुखरूप वाचवले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत बेस्ट बस (Bus) संपूर्णपणे जळून खाक झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या