Thursday, July 23, 2026
Homeक्राईमबसने रस्ता न दिल्याने चालक वाहकाला मारहाण

बसने रस्ता न दिल्याने चालक वाहकाला मारहाण

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी Kopargav

तालुक्यातील येसगाव (Yesgav) शिवारातील नगर-मनमाड रस्त्यावर (Nagar Manmad Highway) नांदगाव आगाराच्या बसने रस्ता न दिल्याने कार चालकाने बस चालक व वाहकाला मारहाण (Bus Driver and Conductor Beating) केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी कारचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

समाधान सोनवणे हे नांदगाव आगराचे बस चालक असून ते आपल्या ताब्यातील परळी नांदगाव ही बस (एमएच 14 बीटी 4174) घेऊन 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी नगर-मनमाड रस्त्याने येसगाव (Yesgav) शिवारातून जात असताना त्यांच्या बसला एमएच 6 बीयू 6700 क्रमांकाच्या कार चालकाने आपल्या ताब्यातील कार आडवी लावली.

कार चालक किसन आण्णासाहेब वराडे याने बस चालक समाधान सोनवणे यांना तू, मला का दाबले असे म्हणून खाली खेचून आपल्याला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अशा आशयाची तक्रार समाधान सोनवणे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात (Kopargav Taluka Police Station) दिली. त्यावरून किसन वराडे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातील साठा ‘किती’ टक्क्यांवर; मुळा धरणही निम्मे भरण्याच्या मार्गावर

0
भंडारदरा |वार्ताहर|Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात मंगळवारनंतर बुधवारीही आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरणातील पाणीसाठा काल...