Friday, April 25, 2025
Homeक्राईमबस चालकाला अज्ञात तरूणाकडून मारहाण

बस चालकाला अज्ञात तरूणाकडून मारहाण

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पाथर्डीहून नगरला प्रवासी बस घेऊन जाणार्‍या बसच्या चालकाला व वाहकाला अज्ञात तरुणाने जबर मारहाण करण्याची घटना बुधवार (दि. 12) रोजी घडली. या घटनेत चालक बाबाजी विश्वनाथ आव्हाड व वाहक सुभाष जयवंत जाधव जखमी झाले आहेत. यासंदर्भात वाहक जाधव यांनी अज्ञात आरोपी विरोधात मारहाणीचा व शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आव्हाड व जाधव हे दोघेही पाथर्डी ते अहिल्यानगर क्रमांक एमएच बीटी 1042 ही बस घेऊन अहिल्यानगरला चालले होते.

- Advertisement -

बुधवारी आठवडे बाजारचा दिवस असल्याने बस हळू जात असताना शहरातील न्यायालयाच्या इमारतीसमोर एका अनोळखी तरुणाने बस थांबवत तो बसमध्ये चढला व त्याने मागच्या चौकात तुम्ही बस का थांबवली नाही, असे म्हणत त्याने अगोदर आव्हाड यांना मारहाण केली, तर वाहक जाधव हे त्याला समजावून सांगत असताना त्याने जाधव यांना सुद्धा मारहाण केली.

या घटनेत जाधव यांच्या गळ्याला व डोक्याला मार लागला आहे. वाहक व चालकाला मारहाण होत असताना मोठी गर्दी जमा होऊन नागरिकांनी मारहाण करणार्‍या तरुणाला रोखले. मात्र तो घटनास्थळावरून पसार झाला. यासंदर्भात वाहक जाधव यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...