Thursday, June 20, 2024
Homeमहाराष्ट्रभीषण अपघात! जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर बस दरीत कोसळली; १३ प्रवाशांचा मृत्यू, २५...

भीषण अपघात! जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर बस दरीत कोसळली; १३ प्रवाशांचा मृत्यू, २५ जखमी

मुंबई | Mumbai

- Advertisement -

आज पहाटे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. एक खासगी बस दरीत कोसळली असून यात १३ जणांचा मृत्यू झाले असून २० ते २५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे…

बसमध्ये एकूण ४० ते ४५ जण प्रवास करत असल्याचे समजते. मुंबईच्या गोरेगाव येथील बाजीप्रभू वादक गट (झांज पथक) हे पुणे येथे एक कार्यक्रम करण्यासाठी गेले होते. पुण्याहून परतताना त्यांच्या बसला जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर अपघात झाला.

Video : नाशिकच्या पालकमंत्र्यांनी पिकअपला सिनेस्टाईल पकडलं अन् समोर आला ‘हा’ धक्कादायक प्रकार…

शिंगरोबा मंदिराच्या अलिकडील घाटात ही बस बाजूच्या दरीत कोसळली. बसमधील २७ जणांना वाचवण्यात आले आहे. बचावकार्यात खोपोलीतील पथक, खंडाळ्यातील पथक, स्थानिक पोलीस, महामार्ग पोलीस यांनी महत्त्वाची मदत उपलब्ध करून दिली.

नाशिक विभागातील २१ तहसीलदारांची खांदेपालट

जखमींना खोपोली ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. मदतकार्यासाठी हायकर्स ग्रुप व आयआरबीचे पथकही हजर आहे. खाजगी रुग्णालयातील डॅाक्टर्सना मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे.

वीज कोसळून महिलेचा मृत्यू

अपघातातील जखमींची नावे

1) नम्रता रघुनाथ गावणूक, वय 29

2) चंद्रकांत महादेव गुडेकर, वय 29 गोरेगाव.

3) तुषार चंद्रकांत गावडे, वय 22 गोरेगाव.

4) हर्ष अर्जुन फाळके, वय 19 गोरेगाव.

5) महेश हिरामण म्हात्रे, वय 20 गोरेगाव.

6) लवकुश रंजित कुमार प्रजाती, वय 16 गोरेगाव.

7) आशिष विजय गुरव, वय 19, दहिसर.

8) सनी ओमप्रकाश राघव, वय 21, खालची खोपोली.

9) यश अनंत सकपाळ, वय 19, गोरेगाव.

10) वृषभ रवींद्र थोरवे, वय 14-गोरेगाव.

11) शुभम सुभाष गुडेकर, गोरेगाव.

12) जयेश तुकाराम नरळकर, वय 24 कांदिवली.

13) विशाल अशोक विश्वकर्मा, वय 23 कांदिवली.

14) रुचिका सुनील धूमणे, वय 17, गोरेगाव.

15) ओम मनीष कदम, वय 18, गोरेगाव.

16) युसूफ उनेर खान, वय 14, गोरेगाव.

17) अभिजित दत्तात्रय जोशी, वय 20, रत्नागिरी.

18) कोमल बाळकृष्ण चिले, वय 15, मुंबई.

19) हर्ष वीरेंद्र दुरी, वय 20, कांदिवली.

20) ओमकार जितेंद्र पवार, वय 24, खोपोली, सोमजाई वाडी ळ.

21) दिपक विश्वकर्मा, वय 21, कांदिवली.

22) हर्षदा परदेशी

23) वीर मांडवकर

24) मोहक दिलीप सालप, वय 18. मुंबई.

मयत

1) जुई सावंत, वय 15, गोरेगाव.

मुख्यमंत्र्यांनी केली मदत जाहीर

या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयाप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दॅवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या