नाशिक | सप्तशृंगीगड । प्रतिनिधी | Nashik | Saptshringigad
गडावर सातव्या माळेला वाढलेल्या गर्दीत एसटी बस सेवा (ST Bus Service) आणि खासगी वाहनाधारकांचा (Private vehicle) धक्का लागलेल्या वादातून बससेवा (Bus Service) काही काळ बंद करण्याचा एसटी सेवकांनी पवित्रा घेतला होता.
याच दरम्यान वाहतूक सेवा विस्कळीत (Transport services disrupted) झाली. त्यामुळे भाविकांना गडावरून खाली उतरताना पायपीट करावी लागली. त्यांचा संताप अनावर झाल्याने त्यांनी पोलीस वाहने, खासगी वाहने अडवून धरत आंदोलन (agitation) केले. रात्री उशिरापर्यंत हा प्रकार सुरू राहिल्याने गडावर वाहतुकीचा बोजवारा उडाला होता.
वाहतुकी सुरळीत करण्यासाठी पोलीस (police), सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट (Saptshringi Niwasini Devi Trust), आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management), तहसील कर्मचारी (Tehsil Staff), माध्यम प्रतिनिधी, सप्तशृंगी ग्रामपंचायत सदस्य (Saptshringi Gram Panchayat Member) यांनी धावपळ केली. त्यामुळे रात्री 12.30 च्या दरम्यान वाहतूक सुरळीत झाली.
गडावर दर्शनासाठी आलेले निफाडचे (niphad) आमदार दिलीप बनकर (MLA Dilip Bankar) सुद्धा या वाहतूक कोंडीत (traffic jam) अडकले. त्यांनी भाविकांची समजूत काढण्यासाठी पुढाकार घेतला. एका न्यायाधीशाच्या गाडीच्या बोनेटवर भाविकाने त्याच्या लहान मुलाला बसवत संताप व्यक्त केला. तर काही भाविकांनी रस्त्यावर ठिय्या करून वाहतूक मार्ग अडवून धरला. वाहतूक कोंडी रात्री उशिरापर्यंत रोखली.
तहसीलदार बंडू कापसे,नांदुरी तलाठी वाघ ,पोलीस उपनिरीक्षक बबन पाटोळे, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, ग्रा.पं. सदस्य राजेश गवळी आदींनी वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी भाविकांची समजूत काढून मार्ग मोकळा केला. मात्र, बस सेवा वेळेवर न मिळाल्यामुळे हजारो भाविकांना सप्तशृंगीगड ते नांदुरी या 10 किलोमीटर अंतरांचा प्रवास पायी करावा लागला. त्यामुळे गडावर नियोजन कोलमडल्याचे चित्र सातव्या माळेला पाहावयास मिळाले.
विनापास वाहने गडावर
सप्तशृंग गडावर व्हीआयपी , इतर खासगी वाहनांना प्रशासनाकडून पास घेऊन गडावर जाण्याची परवानगी आहे. असे असताना पायथ्याच्या कमानीतून पोलिसांच्या देखत खासगी गाड्या विनापास मोठ्या संख्येने गडावर जात होत्या.
एसटीची मुजोरी
एसटी महामंडळाच्या मुजोर कारभाराचा प्रत्यय भाविकांना ऐन गर्दीत आल्याने भाविकांनी एसटी महामंडळावर संताप व्यक्त करताना शिव्यांची लाखोली वाहिली. सातव्या माळेला गर्दीचे प्रमाण अधिक असते, असे असूनही एसटीच्या विविध आगाराकडून गडावर तात्पुरत्या स्वरूपात जादा गाड्या सोडण्याचे नियोजन विभाग नियंत्रकांना करता आले नाही. त्यामुळे अपुर्या गाड्यांच्या माध्यमातून भाविकांची वाहतूक सेवक करत होते. याच ताणतणावातून त्यांचे खासगी वाहनाला धक्का लागल्याने भांडण झाले. त्याचे पर्यावसन थेट गाड्या थांबवून वाहतूक सेवा न देण्याचा कर्मचार्यांचा निर्णय वाहतुक सेवा विस्कळीत होण्यावर झाला. त्याचबरोबर घाटात ठिकठिकाणी एसटीच्या गाड्या बंद पडून पायपीट करण्याची वेळ भाविकांवर आलेली होती.