Sunday, March 30, 2025
Homeनगरबसमध्ये चढताना महिलेचे दागिणे चोरले

बसमध्ये चढताना महिलेचे दागिणे चोरले

अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल

अहमदनगर (प्रतिनिधी) – बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत एका महिलेने दुसर्‍या महिलेच्या पर्स मधील 48 हजार 500 रूपये किंमतीचे सोन्याची दागिणे चोरून नेले. ही घटना आज (रविवारी) चारच्या सुमारास सावेडी नाका बसस्थानकावर झाली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

- Advertisement -

निर्मला सोपान वाघ (वय- 55 रा. चितळी ता. श्रीरामपून हल्ली रा. शिवाजीनगर, पाईपलाईनरोड) या आज चारच्या सुमारास सावेडी बसस्थानक येथे नगर-सिन्नर बसमध्ये चढत होत्या. बसमध्ये चढताना गर्दी होती. या गर्दीचा फायदा एका महिलेने उठवीला. वाघ यांच्या पर्समध्ये असलेले सोन्याची पोत, झुबे, ठुशी, अंगठी असे 48 हजार 500 रूपये किंमतीचे दागिणे लंपास केले. निर्मला वाघ यांच्या चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पुढील प्रवास रद्द करून तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात महिलेविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

AMC : आयुक्तांनी घेतली नगररचनासह अन्य विभागात झाडाझडती

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महानगरपालिकेच्या नगररचना विभागासह इतर विभागात आयुक्त यशवंत डांगे यांनी शुक्रवारी अचानक भेट देत झाडाझडती घेतली. यावेळी अनेक कर्मचारी जागेवर नसल्याने आयुक्तांनी त्यांना...