Thursday, June 13, 2024
Homeक्राईमव्यावसायिकाची जमीन व्यवहारात आठ कोटीची फसवणूक

व्यावसायिकाची जमीन व्यवहारात आठ कोटीची फसवणूक

सहा जणांविरुद्ध कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

येथील एका बांधकाम व्यावसायिकाची जमीन खरेदी विक्री व्यवहारात तब्बल आठ कोटी रूपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये ही घटना घडली असून, बुधवारी (दि. 30) रात्री उशिरा या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल बबनराव जाधव (वय 41, रा. विजयनगर, बोल्हेगाव फाटा, नगर) असे या व्यावसायिकाचे नाव आहे.

त्यांच्या फिर्यादीवरून साईराम अर्बन मल्टीस्टेट बीडचे शाहीनाथ विक्रमराव परभणे (रा. माळी वेस, बीड), संत भगवान बाबा मल्टीस्टेट मुख्य शाखा बालमटाकळी शेवगावचे चेअरमन मयूर रंगनाथ वैद्य (रा. बालमटाकळी ता. शेवगाव), अरकान प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी नाशिकच्या वैशाली योगेश गायकवाड (रा. प्रथमेश प्लाझा, ए/302 सोनी पैठणीजवळ, राका कॉलनी, नाशिक), सचिन शिवराम गरदास (रा. श्रमिक नगर, सावेडी), संत भगवान बाबा मल्टीस्टेटचे मॅनेजर नितीन सोपानराव तुपे (रा. आगरकर मळा, नगर), साईराम अर्बन मल्टीस्टेटचे मॅनेजर शरद सिताराम कुलकर्णी (रा. बीड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित आरोपींनी दुय्यम निबंधक कार्यालय, नगर व संत भगवान बाबा मल्टीस्टेट सोसायटी, चाणक्य चौक येथे कट कारस्थान करून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फिर्यादीला पाच कोटी 46 लाख रूपयांचे चेक दिले. मात्र, ते न वटता परत आले. तसेच दुय्यम निबंधक कार्यालय येथे खोटे व बनावट दस्त करून फिर्यादीची जमीन हडप करून त्यांना पैसे न देता खोटा आर्थिक व्यवहार दाखवला. फिर्यदीचे एकूण आठ कोटी पाच लाख रूपये फिर्यादीला न देता त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या