Wednesday, March 26, 2025
Homeनंदुरबार‘बटरफ्लाय’ ठरली जगातील सर्वोत्तम शॉर्ट फिल्म

‘बटरफ्लाय’ ठरली जगातील सर्वोत्तम शॉर्ट फिल्म

नंदुरबार । प्रतिनिधी nandurbar

डॉ.राजकुमार पाटील निर्मित व डॉ.सुजित पाटील दिग्दर्शित बटरफ्लायफ या हिंदी लघूचित्रपटाला अमेरिकेतील न्यू जर्सी येथे पार पडलेल्या ‘स्टूडंट वर्ल्ड इम्पॅक्ट फिल्म फेस्टीवल’ मध्ये बेस्ट फिल्मचा अवॉर्ड घोषीत झाला. 120 देशांच्या 13 हजार 868 चित्रपटानी या फेस्टीवलमध्ये सहभाग नोंदवला होता. त्यात बटरफ्लायची बेस्ट लघूचित्रपट म्हणून निवड झाली आहे. 25 जून रोजी एका भव्य सोहळयात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. नंदुरबारच्या कलावंतांनी बनवलेल्या या हिंदी लघूचित्रपटाने दक्षिण कोरीयासह भारतात 57 अवार्ड मिळवले आहेत. हा सिनेमा प्रेक्षकांसह आता परिक्षकांच्या पसंतीस उतरला असून अमेरिकेत पुरस्कार मिळवणारा हा खानदेशातील पहिलाच चित्रपट ठरला आहे.

- Advertisement -

सारझन शेट्टी, डॉ.विशाल पाटील, मानसिंग राजपूत या तिघांनी उत्तम अशी सिनेमाटोग्रफी केली असून सुंदर चित्रिकरणामुळे चित्रपट देखणा झाला आहे. रणजित राजपूत, डॉ. राजकुमार पाटील, प्रशंसा तवर, कामिनी भोपे, डॉ.जयंत शाह, दिपक पटेल, संदीप सुर्यवंशी, डॉ.रोहन शाह, डॉ.राजेश कोळी, हितल ठाकरे, नागसेन पेंढारकर, डॉ.अनिकेत नागोटे, दिलीप सोनार, नंदा सोनार, पुनम भावसार, डॉ.वृशाली पाटील, डॉ.स्वप्नील जैन, मनोज पिंपळे, जैनी जयेश, डॉ.प्रशांत ठाकरे, नरेश शाह, रविंद्र पोतदार आदींनी महत्वाच्या भुमिका वठवल्या आहेत. साऊंड अमित त्रिवेदी, प्रोडयूसर डिझायनर रूचिता पाटील, मिक्सिंग प्रशांत झोरे, संगितकार केयुर भगत, प्रियंका भगत, तसेच रूषभ पुणेकर, महेश बोलायकर, शिवाजी महाजन आदींनी चित्रपटाच्या सर्वांगिंन बाजूने कामे केली आहेत.

आतापर्यंत देशभरात 57 अवार्डने सन्मानित बटरफ्लाय या चित्रपटाला 13 हजार 867 चित्रपटांमध्ये आधी नामांकन तसेच त्यानंतर बेस्ट लघू चित्रपटाचा अवार्ड घोषित झाल्याने नंदुरबारसह खानदेशासह महाराष्ट्राचा सन्मान झाला आहे. जगभरातून 120 देशातील चित्रपटातील निवड झाल्याने दिग्दर्शक डॉ. सुजित पाटील यांचे कौतूक होत आहे. अमेरिकेतील इंग्रजी भाषिक परिक्षकांनाही हा सिनेमा भावल्याने निर्माते डॉ.राजकुमार पाटील यांनी आनंद व्यक्त केला आहे.नंदुरबार शहरात यापुढे चित्रपटाची ही परंपरा अशीच सुरू रहावी, यासाठी शहरातील कलावंतांना घेऊन अशाच पध्दतीची कलाकृती निर्माण करू, असा विश्वास डॉ.सुजित पाटील यांनी व्यक्त केला आहे.महेंद्र पब्लिक स्कूल, पिनल शाह, निलेश तवर यांनी या चित्रपटाच्या सहाय्यक निर्माते म्हणून काम पाहिले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 99 ग्रामपंचायतींची आज अंतिम मतदार यादी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणार्‍या, नवनिर्मित, मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे, तसेच बहिष्कार व इतर कारणांमुळे निवडणुका...