Monday, July 22, 2024
Homeनंदुरबार‘बटरफ्लाय’ लघुपटाला उत्कृष्ट शॉर्ट फिल्म ऍवॉर्ड

‘बटरफ्लाय’ लघुपटाला उत्कृष्ट शॉर्ट फिल्म ऍवॉर्ड

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

- Advertisement -

येथील बाल रोगतज्ज्ञ डॉ. सुजित पाटील (Pediatrician Dr. Sujit Patil) यांनी दिग्दर्शीत केलेल्या ‘बटरफ्लाय’ (‘Butterfly’ Short Film) या लघू हिंदी चित्रपटाला आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म महोत्सवात (International Short Film Festival) उत्कृष्ट शॉर्ट फिल्मचा (Best Short Film Award) ऍवार्ड पश्चिम बंगालच्या फेस्टीवलमध्ये (West Bengal Festival) जाहीर (Announced) झाला आहे. तसेच विन्टेज रील्स फिल्म फेस्टीवलमध्येही तीन ऍवार्ड एकटया ‘बटरफ्लाय’ला घोषीत झाल्याची माहिती निर्माते डॉ. राजकुमार पाटील यांनी दिली.

शहरातील डॉक्टर व कलाकारांचा सहभाग असलेला ‘बटरफ्लाय’ हा लघुचित्रपट नंदुरबार शहरात २९ मे रोजी दाखविण्यात आला होता.

त्यावेळेस या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळाला. आता या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात बेस्ट शॉर्ट फिल्म चा अवार्ड मिळवून सुखद धक्का दिला आहे. या चित्रपटातील सर्वच कलाकारांनी उत्तम अशी भुमिका वठवली असल्याचे मत डॉ.राजकुमार पाटील यांनी व्यक्त केले.

या लघूचित्रपटाला बेस्ट युथ डायरेक्टर, बेस्ट डायलॉग, फेस्टिवल मेन्शन ऍवार्ड असे तीन वेगळे ऍवार्ड वीन्टेज रील्स फिल्म् फेस्टीवलमध्ये जाहीर करण्यात आले आहेत.

रणजितसिंग राजपूत, डॉ.राजकुमार पाटील, डॉ.वृषाली पाटील, पुनम भावसार, डॉ. राजेश कोळी, डॉ.प्रकाश ठाकरे, दिलीप सोनार, प्रशंसा तवर, कामिनी भोपे, डॉ.जयंत शाह, संदीप सूर्यवंशी, अनिता वसावे, नंदा सोनार, रविंद्र पोतदार, डॉ.स्वप्नील जैन, नागसेन पेंढारकर, डॉ.अनिकेत नागोटे आदींच्या महत्वपूर्ण भुमिका आहेत.

डॉ.सुजित पाटील यांनी आतापर्यंत पाच शॉर्ट फिल्म बनवल्या असून जवळपास सर्वच लघू चित्रपटांना ऍवार्ड मिळाले आहेत. आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव भरवून त्यांनी नंदुरबारच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला होता.

आता तर त्यांचे लघूचित्रपट आंतरराष्ट्रीय महोत्सवात गाजत आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय लघूचित्रपट महोत्सवात परीक्षक म्हणून देखील काम केले आहे. नंदुरबारच्या लघूचित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ऍवार्ड घोषीत झाल्याने आमच्या टीमला खुप आनंद झाला आहे.

ही केवळ आमच्यासाठीच नव्हेतर खानदेशासाठी अभिमानाची गोष्ट आहे,असे डॉ राजकुमार पाटील यांनी सांगितले. कथा डॉ.सुजित पाटील यांचीच असून मानसिंग राजपूत, सारजन शेट्टी, मयूर सुर्यवंशी यांनी कॅमेरामन म्हणून उत्तम न्याय दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या