Wednesday, October 16, 2024
Homeमहाराष्ट्रBy Election Date 2024 : नांदेड, वायनाड लोकसभेसह ४८ विधानसभा मतदारसंघांत पोटनिवडणूक;...

By Election Date 2024 : नांदेड, वायनाड लोकसभेसह ४८ विधानसभा मतदारसंघांत पोटनिवडणूक; ‘या’ दिवशी होणार मतदान

नवी दिल्ली | New Delhi

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) आज महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. त्यानुसार महाराष्ट्र विधानसभेसाठी (Maharashtra Assembly Election) २० नोव्हेंबरला मतदान (Voting) होणार आहे. तर झारखंडमध्ये १३ आणि २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या दोन्ही राज्यांचा निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी जाहीर होणार आहे.महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबरोबरच काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या नांदेड आणि राहुल गांधी यांनी राजीनामा दिलेल्या वायनाड लोकसभेसह देशभरातील ४८ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रमही निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Maharashtra Assembly Election Date 2024 : विधानसभेचे बिगुल वाजले; एका टप्प्यात होणार मतदान

नांदेड लोकसभेसाठी (Nanded Loksabha) महाराष्ट्र विधानसभेच्या मतदानादिवशी म्हणजेच २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर वायनाड लोकसभेसाठी (Wayanad Lok Sabha) १३ नोव्हेंबरला मतदान होणार असून विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसोबतच या पोटनिवडणुकीचीही मतमोजणी (Vote Counting) होणार आहे. दिवंगत काँग्रेस खासदार वसंत चव्हाण (Vasant Chavan) यांनी भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांना पराभवाची धूळ चारली होती. लोकसभेत प्रतापराव चिखलीकर यांना ४ लाख ६९ हजार ४५२ मतं पडली होती. तर वसंत चव्हाण यांना ५ लाख २८ हजार ८९४ मतं पडली होती. त्यामुळे नांदेडमधून वसंत चव्हाण विजयी ठरले होते. या विजयानंतर काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांचे २६ ऑगस्ट रोजी अकाली निधन झाले होते.

हे देखील वाचा : Jharkhand Assembly Election Date 2024 : झारखंडमध्ये दोन टप्प्यात होणार विधानसभेची निवडणूक; मतदान आणि निकाल कधी?

या विधानसभा मतदारसंघात होणार पोटनिवडणूक

देशातील १४ राज्यांतील ४८ विधानसभा मतदारसंघांमध्ये (Constituencies) पोटनिवडणूक होणार आहे. त्यामध्ये सर्वाधिक ९ मतदारसंघ उत्तर प्रदेशातील आहेत. त्यापाठोपाठ राजस्थानमध्ये ७, पश्चिम बंगाल ६, आसाम ५, बिहार व पंजाब प्रत्येकी ४, कर्नाटक ३, केरळ, सिक्कीम आणि मध्य प्रदेशात प्रत्येकी २ आणि छत्तीसगड, गुजरात, मेघालय व उत्तराखंडमध्ये प्रत्येक एका मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे.

हे देखील वाचा : महायुतीकडून राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी ७ नावांवर शिक्कामोर्तब; ‘यांना’ मिळाली संधी

असे आहे पोटनिवडणुकीचे वेळापत्रक

वायनाड लोकसभा मतदारसंघ व ४७ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १८ ऑक्टोबरला नोटिफिकेशन जारी केले जाणार आहे. त्यानंतर अर्ज करण्यासाठी २५ ऑक्टोबर ही अंतिम तारीख राहणार असून २८ ऑक्टोबरला अर्जांची छाननी केली जाईल. यानंतर ३० ऑक्टोबरला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. तर १३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तसेच उत्तराखंडमधील एक विधानसभा मतदारसंघ आणि महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी २२ ऑक्टोबरला नोटिफिकेशन जारी केले जाणार आहे. त्यानंतर २९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार असून ३० ऑक्टोबरला छाननी होईल. तर ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. या दोन मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार असून सर्व मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला लागणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या