Saturday, November 2, 2024
Homeशब्दगंधबहरली वंशवेल

बहरली वंशवेल

घराघरांतील संवादाला किती महत्त्व आहे हे वेगळे का सांगायला हवे? एक आई ते आजी या प्रवासात बदलत जाणारे संवादाचे टप्पे धुंडाळणारे सदर…

रात्रंदिवस मेहनत करून विद्यार्थी मनासारखी पदवी घेतात. त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे चांगली नोकरी मिळते. मुले अथवा मुली नोकरीत रुळले की दोन-तीन वर्षांत त्यांचे पालक त्यांच्या लग्नासाठी तयारीलाच लागतात. काही मुले प्रेमविवाह पण घरच्यांच्या संमतीने लग्न करतात. काहीवेळा घरून विरोध होतो व दोघांनाही त्रास सहन करावा लागतो. विरोधामागे कारण असते की ही अनोळखी व्यक्ती घरात सर्वांना धरून राहील की नाही? लव्ह मॅरेजला विरोध कारण एकमेकांच्या परिवाराविषयी जास्त माहिती नसते. त्यामुळे भविष्यकाळाविषयी पालकांना काळजी वाटते.

- Advertisement -

अरेंज्ड मॅरेज अर्थातच स्थळ पाहून जुळवलेले लग्न सर्वांना सोयीस्कर वाटते कारण प्रत्यक्षात सर्वांशी बोलणे व परिचय होतो. लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज्ड मॅरेज असो नवदाम्पत्याचा संसार सुरळीत चालणे महत्त्वाचे असते. दोघांनी मिळून जबाबदाऱी विश्वासाने घेतली तर हे प्रश्न फारसे येत नाहीत व घरातील सर्वजण एकमेकांचा आधार बनून व्यवस्थित जीवन जगतात.

एकदा मनाजोगी सुसंस्कृत व सुस्वभावी सुन घरात आली की मुलाची आई आजी होण्याचे स्वप्न पाहू लागते. मुलगी लग्न होऊन सासरी गेली की तिच्या आठवणीने डोळ्यांत पाणी आणणारी आईही आपल्या लाडक्या लेकीला केव्हा मातृत्व लाभेल व आपण तिच्या बाळाची आजी होऊ नि नातवंडांना मांडीवर खेळवू या स्वप्नात रंगू लागते. हळूहळू काळ पुढे सरकू लागतो नि ‘घरात पाळणा हलणार’ या गोड बातमीने घरात आनंदाचे भरते येते. बाळाचे होणारे आजोबाही बाळलीला पाहण्यास उत्सुक असतात. बाळाचा जन्म हा दोन्ही कुटुंबांसाठी सुवर्णदिनच असतो.

प्रसूती वेदना सहन करणारी मुलगी अथवा सून सुखरूप बाळंत व्हावी यासाठी नवसही बोलले जातात. सर्वच चिंतातूर झालेले व कान गोड बातमीकडे लागलेले असतात. डिलिव्हरी रूममधून बाळाचा रडण्याचा आवाज येतो, केवढा आनंदाचा क्षण तो! आता नातवंडांचे तोंड पाहण्याची घाई! आता आई आजी नि बाबा आजोबा झालेले असतात. बाळाला पाहून सर्वच सुखावतात. मुलांच्या आयुष्यातील एक महत्त्वाची काळजी मिटलेली असते. बाळाच्या आगमनाने मुलेही आई-बाबा झाले! केवढा तो उत्साह नि आनंद! देवापुढे प्रथम मिठाई ठेऊन नंतर सर्वांना मोठ्या कौतुकाने वाटली जाते. बाळाचा जन्म हा एक मोठा कौतुक सोहळा असतो. दोन्ही घरे समाधानाने स्थिरावतात या आनंदमय वातावरणाने. आजी आणि आजोबांचे नाते तर बाळाच्या जन्मवेळेपासूनच बाळाशी दृढ आणि घट्ट होऊन जाते. दोघांनाही खेळवायचे आहे त्याला आपल्या मायेच्या सुरक्षित हातात! परमेश्वराला मनोमन हात जोडून त्याचे आभारही मानतात अश्रूपूर्ण नयनांनी. हे आनंदाश्रू जीवनात फार मोलाचे असतात. आनंद हा आपण मिळवण्यावर असतो. नुकत्याच आई झालेल्या लेकीला अथवा सुनेला कुठे ठेवू नि कुठे नको असेही त्यांना होते. आता एक झाड सुंदर बहरलेले असते. त्या झाडावर छानसे फळ आलेले असते. हे फळ आता घरादाराला सुखाचा गोड मेवा व आनंदाचा बहर देणारे असते. वंशवेल बहरलेली असते सुखसमृद्धीसाठी!

क्रमशः

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या