मुंबई | Mumbai
उद्या गुरुवार (दि.२७) पासून राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session) सुरुवात होत आहे. या पावसाळी अधिवेशनाआधी महायुती सरकारचा (Mahayuti Government) मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता राज्याच्या मंत्रिमंडळाचा हा विस्तार लांबणीवर पडल्याची माहिती समोर आली आहे.
हे देखील वाचा : मोठी बातमी! लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीमधील तिन्ही पक्षांत मंत्रिपदासाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्याने तूर्तास मंत्रिमंडळ विस्तार थांबविण्यात आल्याचे बोलले जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (Shivsena and NCP) नेते आग्रही आहेत. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास समसमान मंत्री पदाचे वाटप करण्याची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी होती.पंरतु, आता हा विस्तार होणार नसल्याची माहिती मिळत आहे.
हे देखील वाचा : वर्षा बंगल्यावर बैठकांचा सिलसिला; मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांमध्ये मध्यरात्री बंद दाराआड चर्चा
दरम्यान, या मंत्रिमंडळ विस्तारात तिन्ही पक्षांच्या वाट्याला प्रत्येकी चार मंत्रिपदे (Ministerial Posts) येणार होती. पंरतु, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा भाजपमधील (BJP) आमदारांची संख्या जास्त आहे. परिणामी मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास भाजपला या अंतर्गत नाराजीचा फटका अधिक बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर गेल्याचे सांगितले जात आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा