Wednesday, May 21, 2025
Homeदेश विदेश१०० दिवसांनी शिवराजसिंह चौहान सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार

१०० दिवसांनी शिवराजसिंह चौहान सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार

मध्यप्रदेश मधील शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारच्या २८ मंत्र्यांनी आज शपथ घेतली आहे. यात २० कॅबिनेट तर ८ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे.

- Advertisement -

शपथविधी उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या उपस्थित झाला. त्यांच्याकडे मध्यप्रदेशचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

आजच्या शपथविधीमध्ये शपथ घेणाऱ्या आमदारांमध्ये काँग्रेसला सोडून भाजपवासी झालेले ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या काकू आणि भाजप आमदार यशोधरा राजे सिंधिया यांनी सकाळी शपथ घेतली आहे. १२ सिंधिया समर्थक आमदारांनी देखील शपथ घेतली आहे.

मध्यप्रदेशातील भाजप आमदार गोपाल भार्गव, इमरती देवी, प्रभुराम चौधरी, प्रभूमनसिंग तोमर या बड्या नेत्यांच्या देखील समवेश आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shrirampur : पालिकेच्या अधिकार्‍यांनी गुंडाळली अतिक्रमण मोहीम

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur श्रीरामपूर नगर पालिकेने मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन आहिल्यानगर जिल्ह्यात सर्वप्रथम धडाकेबाज अतिक्रमण मोहीम सुरू केली. सरकारी जागेवरील अतिक्रमणे न्यायालयाच्या आदेशाने हटविण्यात...